लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी गुजरातमध्ये पोहोचले आहेत. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. निवासस्थानी त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी मोदींनी आईचे आशीर्वाद घेतले आणि काही वेळ आईसोबत गप्पा मारल्यानंतर मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्व २६ जागांवर मतदान होत आहे. २०१४ मधील निवडणुकीत गुजरातमधील सर्व २६ जागांवर विजय झाला होता. यंदा २०१४ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर आहे.
नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानापूर्वी मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. यानंतर आईचे आशीर्वादही घेतले.

आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मोदी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर पोहोचले. याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा भाजपा समर्थकांनी गर्दी केली होती. ‘मोदी, मोदी’चे नारेही याप्रसंगी देण्यात आले. मोदींसोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देखील मतदान केंद्रावर उपस्थित होते.