लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरीही हंसराज अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. चंद्रपूर मतदार संघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धानोरकर यांचा विजय झाला. या पराभवानंतर भाजपात काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले. कारण पुन्हा हंसराज अहीर यांना मंत्रिपद मिळणार नाही असे वाटत होते. मात्र तसे घडलेले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहीर यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात येईल असे म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात हंसराज अहीर असणार आहेत हे नक्की झालं आहे असंच म्हणता येईल.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना 514744 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना 559507 मते मिळाली आहेत. एकूण झालेल्या मतदानामध्ये अहीर यांना ४१.५६ तर सुरेश धानोरकर यांना 45.18 टक्के मे मिळाली आहेत. सुरूवातीपासून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूस सुरू होती. गुरूवारी रात्री उशीरा अहीर यांचा पराभव जाहीर करण्यात आला. भाजपाच्या विजयाबाबत त्यांनी कालच आनंद व्यक्त केला.