News Flash

‘बसपाला मत द्यायचे होते, पण भाजपाच्या पोलिंग एजंटने कमळासमोरील बटण दाबले’

मी मतदान कक्षात गेल्यावर ईव्हीएमवर बसपाचे चिन्ह (हत्ती) शोधत होते. पण अचानक भाजपाचा पोलिंग एजंट तिथे आला आणि त्याने कमळासमोरील बटण दाबले

हरयाणामधील फरिदाबाद येथील असावटी गावात भाजपाच्या पोलिंग एजंटमुळे फेरमतदान घ्यावे लागणार आहे. भाजपाच्या पोलिंग एजंटने मतदान केंद्रावर आलेल्या लोकांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केले. इतकंच नव्हे तर काही महिला मतदान करत असताना पोलिंग एजंट मतदान कक्षात गेला आणि कमळचे बटण दाबले, असा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून पोलिंग एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीत फरिदाबादमध्ये 12 मे रोजी मतदान पार पडले. असावटी गावातील मतदान केंद्रावर भाजपाकडून गिरीराज सिंह याला पोलिंग एजंट नियुक्त करण्यात आले होते. मतदान केंद्राचा परिसर हा दलितबहुल असून या भागातील मतदार बहुजन समाज पक्षाला मतदान करतात. गावातील 23 वर्षांच्या विवेचना या तरुणीने 12 मे रोजी मतदान केंद्रावर नेमके काय घडले, याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली. “मी बुथ क्रमांक 88 येथे रांगेत उभी होती. तासभर मी रांगेत होती. मी मतदान कक्षात गेल्यावर ईव्हीएमवर बसपाचे चिन्ह (हत्ती) शोधत होते. पण अचानक भाजपाचा पोलिंग एजंट तिथे आला आणि त्याने कमळासमोरील बटण दाबले. मी त्याला जाब विचारला, पण त्याने उत्तर देणे टाळले”, असा आरोप विवेचनाने केला.

भाजपाच्या पोलिंग एजंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. काही व्हिडिओमध्ये तो मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून गिरीराज सिंहला अटक देखील करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या मतदान केंद्रावर आता 19 मेरोजी फेरमतदान होणार आहे. गावातील अन्य महिला मतदारांनीही गिरीराजनेच कमळासमोरील बटण दाबल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील अधिकारी अमित अत्री यांना निलंबित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 11:07 am

Web Title: haryana bjp polling agent pressed button lotus symbol video viral faridabad
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 पतन अटळ, ममतांना जनताच नमविणार : देवेंद्र फडणवीस
3 EVM वरुन पवार कुटुंबात मतभेद; अजित पवार म्हणतात…
Just Now!
X