लोकसभा निवडणुकीत यावेळी सात टप्प्यात मिळून सरासरी ६७.११ टक्के मतदान झाले. आतापर्यंतचे हे सर्वाधिक मतदान आहे. ही आकडेवारी प्राथमिक आहे. त्यात बदल होऊ शकतात.

गेल्या वेळी म्हणजेच २०१४ मध्ये ६६.४० टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये एकूण ५४३ पैकी ५४२ मतदारसंघात मतदान झाले. वेल्लोर मतदारसंघात पैशाच्या वापरामुळे मतदान रद्द करण्यात आले. त्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन तारीख जाहीर केलेली नाही.

२०१४ मध्ये ८३.४० कोटी मतदार होते. यावेळी ९०.९९ कोटी मतदार होते. २००९ च्या निवडणुकीत ५६.९ टक्के मतदान झाले होते.

मध्य प्रदेशात गेल्या वेळी पेक्षा ५.९२ टक्के मतदान वाढले, तर हिमाचल प्रदेशात पाच टक्के वाढ झाली. चंडीगडमध्ये दहा टक्के घट झाली. पंजाबमध्येही ५.६४ टक्के घट दिसून आली. प्रत्येक राज्यात सरासरी अडीच टक्के वाढ झाली.