25 September 2020

News Flash

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा – पंतप्रधान मोदी

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर कधीपर्यंत सहन करायच? या दहशतवाद्यांना शासन होणार का? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते.

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर कधीपर्यंत सहन करायच? या दहशतवाद्यांना शासन होणार का? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. आज मोदी सरकारने या प्रश्नावर उत्तर दिले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आता आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार. जे आम्ही बोललो आणि करुन दाखवलं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सभेत म्हणाले.

काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री बदलले जायचे. आम्ही ही संस्कृती बदलून टाकली. आता दहशतवाद्यांनी काही केले तर त्यांना पाताळातूनही शोधून मारु. दहशतवादाला मोदी संपवू शकतो असे वाटते तर एनडीएला मतदान करा. सरकारचे हात मजबूत करा असे मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या काळात लोकसभा निवडणुकीच्यावेळी आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत हलवावे लागले होते. पण आता नवरात्री झाली. लोकसभा निवडणूकाही सुरु आहेत आणि आयपीएलचे सामनेही. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्दायावर आपल्या सरकारची कामगिरी उजवी असल्याचे मोदींनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 9:34 pm

Web Title: i am chhatrapati shivaji maharaj mavla narendra modi
Next Stories
1 नरेंद्र मोदींना मतं द्यायची ती कोणत्या निकषांवर?- राज ठाकरे
2 सिंचन घोटाळा झाला की नाही?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
3 नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात काय केलं?-राज ठाकरे
Just Now!
X