News Flash

मीच बिहारचा दुसरा लालू प्रसाद यादव आहे – तेज प्रताप यादव

लालू प्रसाद यादव यांच्या घरात सध्या सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे

लालू प्रसाद यादव यांच्या घरात सध्या सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलं तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. तेज प्रताप यादव यांनी आपणच दुसरे लालू प्रसाद यादव आहोत असं म्हणत आपला मोठा भाऊ तेजस्वी यादवला टोला लगावला आहे. एकाप्रकारे तेज प्रताप यादव यांनी आपणच कुटुंबाचे खरे वारसदार असल्याचा दावा केला आहे. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

लालू प्रसाद यादव सध्या जेलमध्ये असून तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेज प्रताप वारंवार तेजस्वी यादव यांच्यावर टीका करत आहे. गेल्या महिन्यात दोघे भाऊ वाढदिवसानिमित्त एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही कॅमेऱ्यासमोर एकमेकांची गळाभेट घेतली होती. पण हा फक्त दिखावा असल्याचं काही दिवसांतच स्पष्ट झालं.

‘लालू प्रसाद यादव खूप उत्साही व्यक्तिमत्व आहे. ते दिवसाला 10 ते 12 कार्यक्रमांना उपस्थिती लावत असत. पण आता दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली तरी नेते आजारी पडतात’, असं तेज प्रताप यादव यांनी भावाचं नाव न घेता टोला लगावला. तेजस्वी यादव यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे आपले अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

‘माझ्यात लालू प्रसाद यादव यांचं रक्त आहे. ते माझा आदर्श आणि गुरु आहेत. बिहारमध्ये मीच दुसरा लालू प्रसाद यादव आहे’, असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:58 pm

Web Title: i am second lalu prasad yadav in bihar says tej pratap yadav
Next Stories
1 अरविंद केजरीवालांना हादरा, आप आमदार भाजपात
2 ‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
3 …आणि निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्याने सुजय विखे पाटील यांना केले ‘खासदार’
Just Now!
X