भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह, भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. जाहिरनाम्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांबद्दलची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने भारताच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती देताना त्यांना दहशतवाद, लष्कराचे सक्षमिकरण, समान नागरी कायदा, जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारे कलम अशा अनेक विषयांसंदर्भातील जाहिरानाम्यातील पक्षाची भूमिका मांडली. जाणून घेऊयात काय आहे भाजपाच्या जाहिरनाम्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात…

>
घुसखोरी रोखण्यासाठी सर्वौपतरी प्रयत्न करणार

>
देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही

>
राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार

>
जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत दहशतवादाप्रती कठोर भूमिका घेतली जाणार

>
दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सरकार सहन करणार नाही

>
दशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स भूमिका घेणार

>
लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेणार

>
राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील जास्तीत जास्त गोष्टी भारतामध्येच तयार करत सुरक्षेच्या दृष्टीने अधिक स्वावलंबी होण्यावर भर देणार

>
वन रँक वन पेन्शन योजना राबवणार

>
केंद्रिय पोलीस दलाला अधिक सक्षम करणार

>
राज्यातील पोलीस खात्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारांबरोबर चर्चा करुन हवी ती मदत उपलब्ध करुन देणार

>
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी उपाययोजना करणार

>
स्मार्ट फेंन्सींग योजना म्हणजे भारताच्या सिमेंवरील कुंपणे अत्याधुनिक पद्धतीने बांधणार

>
समुद्री सिमांच्या रक्षणासाठी विशेष निधी देणार

>
डाव्या विचारसरणीच्या देशविघातक कारवायांवर अंकूश आणणार

>
भारताच्या सिमेवर अधिक सुरक्षा चौक्या बांधणार

>
जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द करणार

>
समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी करणार