लोकसभा निवडणूक न लढवताही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी विरोधकांना घायाळ करुन सोडले आहे. सभेमध्ये मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ दाखवून मोदींनी पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासन आणि आताची प्रत्यक्ष परिस्थिती यामधील फरक ते मतदारांना दाखवून देत आहेत. मतदारांनाही प्रचाराची त्यांची ही नवी पद्धत प्रचंड भावली आहे. नांदेड, सोलापूर, सातारा, पुण्यानंतर आज त्यांची कोकणातल्या महाडमध्ये सभा सुरु आहे.

राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज यांचा बोलबाला केवळ प्रचारसभांमध्येच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही दिसून येत आहे. मागील सात दिवसांमध्ये गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द चर्च करणाऱ्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचे गुगलच ट्रेण्डसमध्ये दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातल धसई हे देशातलं पहिलं कॅशलेस गाव पण गावात आजही रोखीने व्यवहार चालतात.
– दिव्याखाली अंधार अशी कॅशलेस गावातील स्थिती.
– व्यवहार कॅशलेस होतं नाहीत.

– मोदी सरकारने आकडे दाबून टाकले. हिटलरची ही पद्धत मोदींनी भारतात आणली.

– नरेंद्र मोदींना दत्तक घेतलेल्या गावाकडे बघायला वेळ नाही तर ते तुमच्याकडे बघणार.

– नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात खूप वाईट परिस्थिती. काहीही काम झालेलं नाही. नाल्याची व्यवस्था झालेली नाही. चिखलातून लोकांना जावे लागते.

– साठ वर्षात पंडित नेहरु, इंदिरा गांधीनी काही केलं नसतं. तर व्हॉट्स अॅप कुठून आलं असतं तुम्ही खोटा प्रचार कसा करु शकला असता.

– मोदींच्या खोट बोलण्याला मर्यादा नाही.
– एका आठवडयात साडेआठ लाख संडास बांधले. मिनिटाला ३४ संडास बांधले. सेकंदाला सात संडास बांधले. इतक्या लवकर संडास कसे बांधू शकतात.

– नोटबंदी फसली, ९९.३ टक्के पैसे परत आले.
– नोटबंदीपूर्वी जेवढी रक्कम फिरत होती, त्यापेक्षा जास्त रक्कम आता फिरत आहे.

– नोटबंदी आज पूर्णपणे फसली आहे.
– नोटबंदीचा निर्णय घेताना आरबीआय गव्हर्नर, सरकार, अर्थमंत्र्यांना माहिती नव्हती.
– नरेंद्र मोदींना नोटबंदीचा झटका आला म्हणून रागेत उभं राहून लोकांचा जीव गेला.

– निवडणुकीत भाजपा हजारो कोटी रुपये वाटत आहेत. कुठून आले पैसे तुमच्याकडे?

– मोदी-शाह दोन माणसचं देश चालवतात.
– मेक इन इंडियाच काय झालं?
– कॅप्टन अमोल यादव यांना ३५ हजार कोटी रुपये प्रकल्पात गुंतवणार म्हणून महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिलं.
– आज तेच कॅप्टन अमोल यादव अमेरिकन कंपनीबरोबर करार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

– कोकण केरळपेक्षा पुढे आहे.
– आमदार परदेश दौरे करुन आले कोकणात काय बदल झाला ?
– रस्ते होणं म्हणजे विकास नाही.
– परदेशाच्या धर्तीवर कोकणाचा विकास झाला तर तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र जगवू शकतात.
– अॅमेझॉन खोऱ्यानंतर सहयाद्रीच्या खोऱ्यामध्ये जैवविविधता.
– स्वत:च आयुष्य आणि परिवारामध्ये नेते गुरफटले आहेत.

– शिवसेना-भाजपा दोघेही लाचार म्हणून युती केली.
– सत्ता, पैशासाठी जनतेचा विचार करणार नाहीत.
– कोकणाची क्षमता लक्षात घेतली तर कोकण कुठच्या कुठे असायला पाहिजे होतं.
– केरळ पर्यटनावर चालते.

– माझ्या हाताला खोटया गोष्टी लागू नयेत म्हणून इंटरनेटवरुन त्या गोष्टी काढल्या जात आहेत.
– भाजपाला उघड पाडण्याचा विचार काल, परवाचा नाही. सहा महिन्यापासून तयारी सुरु होती.
– राजकारण्यांनी खोटी स्वप्न दाखवू नयेत म्हणून जुने व्हिडिओ दाखवत आहे.