24 January 2020

News Flash

दिवसा तपासणी, रात्री शुकशुकाट

निवडणूक आयोगाचे तपासणी नाके सायंकाळनंतर शांत

बोईसर-तारापूर मार्गावर पाचमार्ग नाका येथे पोलिसांकडून एखाद दुसऱ्या वाहनाची तपासणी केली जाते. अन्य वाहने तपासणी न करताच निघूत जात आहेत.      (छायाचित्र : हेमेंद्र पाटील)

निवडणूक आयोगाचे तपासणी नाके सायंकाळनंतर शांत

हेमेंद्र पाटील, बोईसर

पालघर लोकसभा क्षेत्रात निवडणूक आयोगाकडून मुख्य नाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. मात्र हे तपासणी नाके संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंतच चालू असल्याचे चित्र आहे. दिवसभर वाहनांची तपासणी केली जाते, मात्र संध्याकाळनंतर या तपासणी नाक्यांवर उभे असलेले पोलीस व निवडणूक कर्मचारी रात्रीच्या वेळी मात्र तिथे दिसत नाहीत. त्यामुळे निवडणुकीनिमित्त बेकायदा कामे करण्यास रात्रीच्या वेळी मोकळीक मिळत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू आणि पैशांचे आमिष दाखवले जाते. मतदारापूर्वीच्या काही दिवसांत अशा कामांना जोमाने सुरुवात होते. पैसे आणि दारूचे वाटप होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी केले जाते आणि ज्या वाहनांमध्ये अशा प्रकारे घबाड असेल तर ते जप्त केले जाते. मात्र केवळ दिवसाच तपासणी होत असल्याने राजकीय पुढारी दिवसा पैसे व दारू यांची वाहतूक करताना दिसून येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे नाक्यावरील तपासणी ही फक्त एक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असते, असे चित्र दिसत आहे. त्यातच तपासणी नाक्यांवर सामान्य नागरिकांची वाहणे तपासली जातात. मात्र राजकीय पुढारी शक्यतो रात्रीच्या वेळेतच वाहतूक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चोरटय़ा मार्गावर प्रशासनाचे दुर्लक्ष

बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यावर पाचमार्ग येथे तपासणी नाका दिवसा असला तरी या भागातून वाणगावकडे जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. यामध्ये परनाळी-वाणगाव रस्ता, कुरगाव- दहिसर-अक्करपट्टी हे रस्ते आहेत. बेकायदा माल वाणगावकडे नेण्यासाठी हे चोरटे मार्ग आहेत. मात्र या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

पाचमार्ग नाका येथे तैनात केलेल्या तपासणी नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांना थांबवून वाहने तपासणी केली जातात. वाहन तपासणीस आमचा विरोध नाही. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या वाहनांची तपासणीही केली जात नाही. रात्रीच्या वेळीही कोणत्याही वाहनांची तपासणी केली जात नाही. 

-प्रदीप पाटील, स्थानिक रहिवासी, पाचमार्ग नाका

मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागात पैसे व दारूचे वाटप करतात. निवडणूक आयोगाने तैनात केलेले तपासणी नाके रात्रीच्या वेळीही असणे गरजेचे असून चोरटय़ा रस्त्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालता येईल.

-भरत वायडा, भूमिसेना कार्यकर्ता

First Published on April 24, 2019 3:00 am

Web Title: in the palghar lok sabha ec appoint special squad to inspection vehicle
Next Stories
1 संघर्ष समितीला ‘शिंदेशाही’चे वावडे
2 मुंबईच्या आखाडय़ात ४ निरक्षर, ४५ पदवीधर!
3 मतदारसंघाचा चांगला विकास झाला
Just Now!
X