News Flash

जळगावमधील व्यापाऱ्यांचा कौल कोणाला ?., भाजपा वर्चस्व राखेल ?

पुन्हा सत्तेत आल्यावर मोदींनी छोट्या उद्योजकांचा विचार करायला हवा

समीर जावळे, जळगाव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे मोदींची लाट नाही. मात्र पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील. असं मत जळगावातल्या व्यापारी वर्गाने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर GST आणि नोटाबंदीचा काय परिणाम झाला, यावरही व्यापारी वर्गाने मत मांडले.

नोटाबंदीचा निर्णय बहुतांश व्यापा-यांना रूचलेला नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नुकसान सहन करावं लागलं, अजूनही तोटा सहन करतो आहोत असं फुले मार्केट जळगावच्या व्यापा-यांनी सांगितलं. GST बाबत सुरूवातीला फारशी माहिती नव्हती आता मात्र हा कर भरण्यास फारशा अडचणी येत नाहीत. हा कर सोयीस्कर वाटतो आहे असं मत काही जणांनी व्यक्त केलं. मोदी सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले. व्यवहार डिजिटल करण्याचा निर्णयही चांगला आहे त्यामुळे काळ्या व्यवहारांवर आळा बसण्यास मदत झाली असंही काही व्यापा-यांनी व्यावसायिकांनी सांगितलं.

दरम्यान मोदींना देशाने आणखी एक संधी जरूर द्यायला हवी. मात्र पुन्हा सत्तेत आल्यावर मोदींनी छोट्या उद्योजकांचा विचार करायला हवा असं मत युवा सेना अध्यक्ष सागर मुंधडा यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलं. एकंदरीतच व्यापारी उद्योजकांचा कौल भाजपाला मिळेल असं दिसतंय.मात्र मोदी सरकारने आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही मागणीही होताना दिसते आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे मोदींची लाट नाही मात्र पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील. असं मत जळगावातल्या व्यापारी बांधवांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर GST आणि नोटाबंदीचा काय परिणाम झाला हेदेखील आम्ही जाणून घेतलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 5:04 pm

Web Title: jalgaon shopkeepers small traders reaction on bjp modi government
Next Stories
1 शहीद करकरेंचा अपमान केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहना नोटीस
2 ५० एकर जमीन आणि घरदार विकून निवडणूक लढवणारा जालन्यातील अवलिया
3 माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली – धनंजय मुंडे
Just Now!
X