देशात राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे समर्थकही एकमेकांवर टिका करताना दिसत आहेत. अनेकदा ओळखीच्या लोकांमध्ये राजकारणावरुन होणारी टिका खालच्या स्तराला जाते आणि नात्यांमध्ये वितुष्ट येते. एकाद्या राजकीय पक्षाची किंवा राजकीय नेत्याची बाजू घेण्यावरुन अनेकदा मित्रामित्रांमध्ये वाद होऊन कायमच दुरावा निर्माण होत असल्याची अनेक उदाहरणे नेटकरी सोशल नेटवर्किंगवर शेअर करतात. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर राजकारणासाठी मैत्री गमावू नका असा संदेश देणारा एका मित्रांच्या ग्रुपचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

‘व्हॉइस ऑफ साऊथ इंडिया’ या फेसबुक पेजने शेअर केलेल्या फोटोमध्ये एकाच एकाच गाडीमध्ये मित्रांचा संपूर्ण ग्रुप बसलेला दिसत आहे. प्रत्येकाच्या हाताता वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे झेंडे असून ते हसताना दिसत आहेत. या फोटोत काँग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे तरुणांच्या हातात असलेले दिसत आहेत. या एका गाडीमध्ये दक्षिणेत एकमेकांविरोध लढणाऱ्या संयुक्त लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी आणि भाजपा या तिन्ही विचारसणीला पाठिंबा देणारे मित्र एकाच गाडीतून प्रवास करत होते. फोटोखालील कॅप्शनमध्ये, ‘हे फक्त केरळमध्येच होऊ शकते. वेगळ्या राजकीय विचारसरणीमुळे तुमचे मित्र गमावू नका,’ असं म्हटलं आहे.

हा फोटो या पेजने शेअर केल्यानंतर ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर व्हायरल झाला असून अनेकांनी या फोटोतील संदेश सर्वांनील लक्षात घ्यायला हवा असे मत नोंदवले आहे. पाहुयात व्हायरल पोस्ट…

इन्क्रेडीबल इंडिया

दुर्मिळ…

केरळ रॉक्स

सुंदर

शिकण्यासारखं बरचं काही

या फोटोच्या माध्यमातून राजकीय मतभेद आणि मैत्री या दोन वेगळ्या गोष्टी असून एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा बळी देऊ नका असाच संदेश नेटकऱ्यांनी दिला आहे.