News Flash

ध्वनीचित्रफितीविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार

निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराचा प्रचार करणारी ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याचे प्रकार वाढत आहेत.

ध्वनीचित्रफितीविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार
किरीट सोमय्या

निवडणूक प्रचारासाठी उमेदवाराचा प्रचार करणारी ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याचे प्रकार वाढत आहेत. सध्या ईशान्य मुंबईत फिरणारी अशाच प्रकारची एक ध्वनिचित्रफीत वादात सापडली आहे. ती तयार करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक अधिकारी, सायबर पोलिसांकडे केला आहे.

या ध्वनिचित्रफितीत ‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ या सोमय्या यांच्या वाक्याचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच ईशान्य मुंबईतील महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची छायाचित्रे दिसतात आणि ‘भाऊ आला..’ हे गीत, ऐकू येते.

मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘कोटक हे माझे भाऊ आहेत. हा माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल,’ असे विधान सोमय्या यांनी केले होते. संजय पाटील यांनाही ‘भाऊ’ या टोपणनावाने संबोधले जाते. त्यामुळे सोमय्या यांचे विधान अर्धे उचलून ही ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या ध्वनिचित्रफितीचा वापर पाटील यांच्या प्रचारासाठी सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 12:43 am

Web Title: kirit somaiy complaint against sound recording
Next Stories
1 भिवंडीतील बंड थंड?
2 नाशिकमध्ये चौरंगी, दिंडोरीत तिरंगी लढत
3 सभांना गर्दी जमविताना कार्यकर्त्यांची दमछाक
Just Now!
X