भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाला  मिळालेल्या ऐतिहसीक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

तसेच, भाजपा अध्यक्ष अमित शाह व सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक भाजपाचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी झोकून देऊन काम केल्याने, पक्षाला एवढे मोठे यश मिळाले. असेही अडवाणी म्हणाले.