देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थांबला. त्यानंतर येत्या मंगळवारी, २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यात १५ लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये आज प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान, रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांनी विविध प्रकारे मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशात ९ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेनुसार, मतदानापूर्वी ४८ तास आधी प्रचार थांबतो. त्यानुसार, तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला, या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकूण १५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मंगळवारी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

रविवारीच प्रचार संपणार असल्याने सुट्टीचा दिवस साधत अनेक उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. पदयात्रा, रोडशो त्याचबरोबर देवदर्शन याद्वारे उमेदवारांनी मतदार राजाला आणि देवालाही आपल्याला या लोकसभा २०१९च्या निवडणुकीत चांगले यश मिळू दे यासाठी साकडे घातले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha campaigning for the third phase of polling stopped voting will be 23rd april
First published on: 21-04-2019 at 18:39 IST