03 March 2021

News Flash

‘फिर एक बार मोदी सरकार’, भाजपाच्या टॅगलाईनची घोषणा; प्रचार गाणं ही प्रदर्शित

'काम करणारे सरकार', 'प्रामाणिक सरकार' आणि 'मोठे निर्णय घेणारे सरकार' या तीन संकल्पनांवर भाजपा काम करणार.

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची टॅगलाईन आणि प्रचार गाणे प्रसिद्ध केले आहे. भाजपाने यावेळी ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन आणि थीम साँग प्रसिद्ध केले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यंदा भाजपा तीन संकल्पनेवर काम करत असल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले. पहिली संकल्पना ही ‘काम करणारे सरकार’, दुसरी ‘प्रामाणिक सरकार’ आणि तिसरी ‘मोठे निर्णय घेणारे सरकार’ अशा तीन संकल्पना आहेत. ‘अबकी बार फिर मोदी सरकार’ ही त्यांची यावेळची नवीन टॅगलाईन असेल. ‘राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही पाच वर्षांत एकदाही कर वाढवलेला नाही. आमच्या सरकारने मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. आमचा काम करण्यावर विश्वास असल्याचे’ जेटली म्हणाले.

जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना ते म्हणाले की, ‘केंद्रात मजबूत सरकार बनावे असे त्यांना (काँग्रेस) वाटत नाही. काँग्रेसने ७२ वर्षांत काहीच केलेले नाही. आम्ही पाच वर्षांत खूप काम करुन दाखवलेले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. कारण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यम वर्गांसाठी काहीच नाही. देशाच्या जनतेला निश्चित करायचे आहे की त्यांना मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार.’

भाजपाच्या प्रचार गाण्यातील बोल असे, पांच साल पहले, देश ने देखा था एक सपना. सबके साथ भी होता हो, विकास सबका अपना. चाचा-भतीजा कोई नही, बस काबिलियत से देश चले. फेक-वेक, फर्जी नहीं, बस सच्चाई से देश बढे. धीरे-धीरे काम न हो, जो हो तेज फटाफट हो. कालेधन से जंग छिडे, गरीब का बेडा पार हो…..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 6:20 pm

Web Title: lok sabha election 2019 bjp released theme song give a new slogan ek bar fir modi sarkar
Next Stories
1 ..मोदींच्या घरात कोणी आहे का? कुटुंबीयांवरुन केलेल्या विधानाला शरद पवारांचे प्रत्युत्तर
2 पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिलला वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार
3 राहुल पंतप्रधान झाले तर शरद पवारांना चालेल का, विनोद तावडेंचा राज ठाकरेंना सवाल
Just Now!
X