News Flash

सुशीलकुमार शिंदे यांचे नाव दगडू; उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळला

सुशीलकुमार शिंदे यांच्या जन्म दाखल्यावर दगडू संभू शिंदे असे नाव होते.

सुशीलकुमार शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अर्जास हरकत घेतली होती. मात्र दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधीने सक्षम कागदपत्रे सादर केल्याने त्यांची हरकत फेटाळण्यात आली.

सुशीलकुमार शिंदे यांच्या जन्म दाखल्यावर दगडू संभू शिंदे असे नाव होते. त्यांनी गॅझेटमध्ये बदल करून सुशीलकुमार संभाजी शिंदे बदल केला. पण मतदार यादीत त्यांचे नाव सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असे आहे. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारी अर्जात वयाची चुकीची नोंद केल्याची तक्रार गायकवाड यांनी केली होती.

गायकवाड यांच्या हरकतीबाबत शिंदे यांच्या नावातील बदलाबाबत १ मे १९६५ रोजी सादर केलेल्या गॅझेटबाबत पुरावा सादर करण्यात आला. त्यावरून हरकत फेटाळण्यात आली. तर वयाबाबत २५ वर्षे पूर्ण असल्याने तो मुद्याही ग्राह्य धरला नाही.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या दाखल्यावर हरकत घेत त्यांचा जातीचा दाखला बनावट असून ते हिंदू लिंगायत जातीचे आहेत. यासाठी गायकवाड यांनी महास्वामी यांचा जन्म दाखला, शाळेचा दाखला सादर केला. त्यांचे मूळ नाव नुरवंद गुरूबसय्या हिरेमठ असे आहे. पण जिल्हाधिकारी यांनी हरकत फेटाळून लावली. याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 4:26 pm

Web Title: lok sabha election 2019 objection on sushil kumar shindes candidature but rejected congress bjp
Next Stories
1 मसूदवरील प्रस्तावाने चीनचा तीळपापड; अमेरिकेवर केला UN च्या खच्चीकरणाचा आरोप
2 पार्थ पवारांची धावाधाव; बैलगाडी, रिक्षा, रेल्वेतून घेतल्या जनतेच्या गाठी-भेटी
3 भारताने सांगितलेल्या जागांवर दहशतवादी तळ नाहीतच, पाकच्या उलट्या बोंबा
Just Now!
X