नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होईल. राज्यात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडावे म्हणून एकूण ११ हजारांवर सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

विदर्भात सात मतदारसंघांत मतदान

११६ उमेदवार रिंगणात; १ कोटी ३० लाख मतदार; १५ हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून तीन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात होईल. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ५०० हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे.

सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत.

मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना व भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारली असून त्यांच्याऐवजी नाना पंचबुद्धे यांना रिंगणात उतरवले आहे.

* चंद्रपूर-वणी-आर्णी

एकूण मतदार :

१८ लाख ९१ हजार ४४४

एकूण उमेदवार : १३

प्रमुख लढत : विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर (भाजप), सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस), राजेंद्र महाडोले (वंचित बहुजन आघाडी)

* यवतमाळ-वाशिम

एकूण मतदार :

१९ लाख १४ हजार ७८५

एकूण उमेदवार : २४

प्रमुख लढत : विद्यमान खासदार भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (काँग्रेस) पी.बी. आडे (भाजप बंडखोर अपक्ष)

* वर्धा

एकूण मतदार :

१७ लाख ४३ हजार २०६

एकूण उमेदवार : १४

प्रमुख लढत : विद्यमान खासदार रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (काँग्रेस), धनराज वंजारी (बहुजन वंचित आघाडी)

* गडचिरोली- चिमूर एकूण मतदार :

१५ लाख ८ हजार १

एकूण उमेदवार : ५

प्रमुख लढत : विद्यमान खासदार अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस), डॉ. रमेश गजबे (वंचित बहुजन आघाडी)

* भंडारा-गोंदिया

एकूण मतदार :

१८ लाख ८ हजार ९४८

एकूण उमेदवार : १४

प्रमुख लढत : नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी), सुनील मेंढे (भाजप), डॉ. विजया नंदुरकर (बसपा)

* नागपूर</strong>

एकूण मतदार :

२१ लाख २६ हजार ५७४

एकूण उमेदवार : ३०

प्रमुख लढत : विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (काँग्रेस), मो.जमाल (बसपा)

* रामटेक एकूण मतदार :

१८ लाख ९७ हजार ६२३

एकूण उमेदवार : १६

प्रमुख लढत : विद्यमान खासदार कृपाल तुमाने (शिवसेना), किशोर गजभिये (काँग्रेस), सुभाष गजभिये (बसप)