हिमाचल प्रदेशमध्येभाजपाच्या चारही जागा कायम

लोकसभेच्या केवळ चार जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये राज्यातील सत्ताधारी भाजपाने सर्व ठिकाणी ३.२३ लाखांहून अधिक मताधिक्य नोंदविले. भाजपाच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा फरकाने राज्यातील लोकसभेकरिता यश मिळाले आहे. २०१४ मध्येही हिमाचल प्रदेशच्या चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या.

पक्षाला सर्वाधिक मतफरक, ४.६६ लाख हा कांगरा लोकसभाग जागेवर मिळाला आहे. येथे पक्षाचे उमेदवार किशन कपूर यांनी काँग्रेसच्या पवन काजल यांना मागेटाकले. २०१४ मध्ये येथेराज्याचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार विजयी झाले होते. यंदा भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारत कपूर यांना उमेदवारी दिली. कपूर हे राज्यात केंद्रीय मंत्री होते. हमीरपूरचे सध्याचे भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या रामलाल ठाकूर यांचा पराभव केला.

शिमलामध्ये काँग्रेसच्या कर्नल डॉ. धनीराम शांडिल यांना भाजपच्या सुरेश कश्यप यांच्याकडून हार स्वीकारावी लागली. २०१४ मध्ये येथून भाजपचे वीरेंदर कश्यप हे विजयी झाले होते. त्यांच्याऐवजी पाचडचे आमदार सुरेश कश्यप यांना यंदा येथून उमेदवारी देण्यात आली. मंडी मतदारसंघातून भाजपचे राम स्वरूप शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या आश्रय शर्मा यांचा पराजय झाला. येथे मुख्य टक्कर भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये होती. राज्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी यंदा भाजपा, काँग्रेसबरोबरच माकप आणि ‘आप’चेही उमेदवार निवडणुकीच्या िरगणात होते.