30 September 2020

News Flash

उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांचा प्रताप, ११ लाखांचा ऐवज लंपास

अनेकांनी मिरवणूक अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते.

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढली होती.

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढली होती. यावेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी तब्बल ३८ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ४५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरत चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे केले.

उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे जिल्ह्यातील आजीमाजी आमदार यांच्यासह जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी मैदानात जमले होते. उदयनराजेंची राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढली होती. यासाठी सातारा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी कडक बंदोबस्त करण्यात आला होता.

उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन साताऱ्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. मिरवणुकीत जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील रोकड लंपास केली. गर्दीमध्ये चेन व पॉकेट खाली पडले असावे, म्हणून कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, अनेक जण अशा प्रकारे शोधाशोध करत असल्याचे पाहून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेकांनी मिरवणूक अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात असल्याने तक्रार घ्यायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला होता.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकांनी ठाण्यासमोर गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून तक्रारी घेण्यात आल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण २६ तोळे सोने व ७ हजार रुपये रोकड मिळून ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कमानी हौद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान, सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांनी तक्रारी दिल्या. या घटनेची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून रॅली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 4:37 pm

Web Title: lok sabha election 2019 satara the thieves steal 11 lakhs of money in udayanraje bhosale nomination rally
Next Stories
1 किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी
2 ‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’, धनंजय मुंडेंचा रावसाहेब दानवेंना टोला
3 बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची कॅम्पसमध्ये गोळ्या घालून हत्या
Just Now!
X