राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसून आले आहे.

उदयनराजेंकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच एक अब्ज १६ कोटी ३५ लाखांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे ३७ किलो सोने असून, त्यांची किंमत एक कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये आहे. उदयनराजेंकडे ९१ लाख ७० हजारांच्या चार आलिशान गाड्या आहेत. तर ३५ लाख रुपयांचे कर्जही आहे.

Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
property developers Kalyan seized
कल्याणमधील २६ विकासकांच्या ११४ कोटींच्या मालमत्ता जप्त, ८८ हजार ८७६ चौरस मीटरच्या मालमत्तांचा लिलाव

खासदार उदयनराजे यांनी उमेदवारी अर्ज भरताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले असे नाव नमूद केले आहे. त्यांनी २०१७ -१८ मध्ये एक कोटी १५ लाख ७१ हजाराचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले आहे. पत्नी दमयंतीराजे यांनी २०१७ -१८ मध्ये आठ लाख ७२ हजार रुपयांचे कर प्राप्त उत्पन्न तर हिंदू अविभक्त कुटुंब १६ लाख २३ हजाराचे कर प्राप्त उत्पन्न दाखवले आहे. उदयनराजेकडे १८ लाख १५ हजार ८५० रुपये तर दमयंतीराजेकडे १ लाख १५ हजार २३ रुपये तर अविभक्त कुटुंब म्हणून तीन लाख २५ हजार ६९१ रुपयांची रोकड आहे. उदयनराजेंच्या विविध बँकात २९ लाख ७६ हजार १६६ रुपयांच्या व दमयंतीराजे यांच्या ३८ लाख ८३ हजार ९७० रुपयांच्या ठेवी, अविभक्त हिंदू कुटुंबाच्या नावे २१ लाख १५ हजार रुपये शिल्लक आहेत. शेअर्स, म्युच्युअल फंडात एक कोटी ४२ लाख गुंतविलेले आहेत. तर पत्नी दमयंतीराजे यांनी बिटकॉइनमध्ये चार लाखांची गुंतवणूक केली आहे. विविध संस्था, कंपनी भागीदारी संस्थांनी दिलेल्या रकमा आठ कोटी १६ लाख ५४ हजारांच्या आहेत. उदयनराजेकडे ९१ लाख ७० हजाराच्या ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर दमयंतीराजेंकडे पोलो ही चार लाखांची कार आहे. उदयनराजेंकडे एक कोटी ३३ लाख ७५ हजारांचे ३७ किलो सोने आहे. दमयंतीराजेंकडे ३२ लाख ९८ हजारचे विविध दागिने आहेत. हिंदू अविभक्त कुटुंबाकडे २३ लाख ६१ हजाराचे दागिने आहेत. उदयनराजेंकडे एक अब्ज १६ कोटी ३५ लाख ७३ हजार किमतीची शेत जमीन तर १८ कोटी ३१ लाखांची बिगरशेती जमीन आहे. २६ लाख ३७ हजारांच्या वाणिज्य इमारती, २२ कोटी ३१ लाख ९२ हजारांच्या निवासी इमारती आहेत, अशी एकूण एक अब्ज ५७ कोटी २५ लाखांची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर ३५ लाख ६९ हजाराचे वैयक्तिक कर्ज आहे.