Exit Poll 2019: लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा २०१४ पेक्षा वाढतील,  असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पंतप्रधानपदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार नाही, असे एक्झिट पोलमध्ये दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदींची पुन्हा सत्ता येणार का, भाजपा बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशी कामगिरी करणार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात काय होणार, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीने भाजपासमोर चांगले आव्हान निर्माण केल्याचे दिसते. तर गुजरात, दिल्ली या राज्यांमध्ये भाजपाचे वर्चस्व कायम राहणार असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण केल्याचे एक्झिट पोलमधून समोर येते.

वाचा सविस्तर: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा?, भाजपाला ‘अच्छे दिन’

वाचा सविस्तर: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला हादरा, ‘बुआ-भतीजा’ची मुसंडी ?

Exit Poll 2019 प्रमुख एक्झिट पोलचा अंदाज

> टाइम्स नाऊ – व्हीएमआर: एनडीए – ३०६, यूपीए- १३२, अन्य – १०४

> इंडिया न्यूज – एनडीए- २९८, यूपीए- ११८, अन्य – १२७

> रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीने दोन एक्झिट पोल केले आहेत. यातील एक एक्झिट पोल सीव्होटर तर दुसरा एक्झिट पोल ‘जन की बात’ चा आहे.

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर : एनडीए- २८७, यूपीए – १२८, अन्य – १२७
रिपब्लिक टीव्ही – जन की बात: एनडीए- ३०५, यूपीए- १२४, अन्य – ८७

> एनडीटीव्ही: एनडीए- ३००, यूपीए- १२७, अन्य – ११५

> आयएएनएस- सी व्होटर: भाजपा- २३६, काँग्रेस – ८०
एनडीए- २८७

> नेता- न्यूज एक्स: एनडीए- २४२, यूपीए – १६४, अन्य – १३६

> न्यूज १८ : एनडीए- २९२- ३१२, यूपीए – ६२- ७२

> एबीपी – नेल्सन : एनडीए – २६७, यूपीए – १२७, अन्य १४८ (भाजपा – २१८, काँग्रेस ८१)

> टुडेज चाणक्य: एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७  (भाजपा – ३००, काँग्रेस- ५५)

Live Blog

Highlights

    21:43 (IST)19 May 2019
    'चाणक्य'चा अंदाज काय ?

    टुडेज चाणक्य: एनडीए- ३५०, यूपीए- ९५, अन्य ९७  (भाजपा - ३००, काँग्रेस- ५५)

    20:13 (IST)19 May 2019
    पश्चिम बंगालमध्ये भाजपा जोमात ?

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच एक्झिट पोलमधील अंदाज हे ममता बॅनर्जी यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरले आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ जागा आहेत. 

    टाइम्स नाऊ- व्हीएमआर: एनडीए- ११, यूपीए - २,  अन्य - २९  

     एबीपी - नेल्सन : भाजपा - १६, काँग्रेस - २, तृणमूल काँग्रेस - २४

    20:05 (IST)19 May 2019
    जम्मू- काश्मीरमध्ये भाजपाची परिस्थिती काय ?

    जम्मू- काश्मीरमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत.  इंडिया टुडे अॅक्सिस My India च्या एक्झिट पोल भाजपा आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांना प्रत्येकी २ ते ३ जागांवर बंदी घालण्यात आली आहे. तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता. 

    19:53 (IST)19 May 2019
    दिल्लीत भाजपाच ?

    दिल्लीतील लोकसभेच्या सात पैकी सहा जागांवर भाजपाचा तर काँग्रेसचा एका जागेवर विजय होणार असा अंदाज इंडिया टुडे अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

    19:40 (IST)19 May 2019
    'चाणक्य'च्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडबाबतचा अंदाज काय ?

    'चाणक्य'च्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला ९ तर काँग्रेसला २ जागांवर विजय मिळण्याची शक्यता.

    19:32 (IST)19 May 2019
    तेलंगणात काय होणार ?

    इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलनुसार तेलंगणमध्ये भाजपा १ ते ३, काँग्रेस १ ते ३ आणि टीएसआर १० ते १२ जागांवर विजयी होण्याची शक्यता. एमआयएमला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता.  तेलंगणात एकूण १७ जागा आहेत. 

    19:29 (IST)19 May 2019
    कर्नाटकात भाजपाचे वर्चस्व ?

    इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये भाजपा २१ ते २५, काँग्रेसप्रणित यूपीए ३ ते ६ आणि अन्य पक्षाला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडीने बाजी मारली होती. 

    19:26 (IST)19 May 2019
    तामिळनाडूत काँग्रेसचे वर्चस्व ?

    इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत भाजपाप्रणित एनडीएला ४ जागा,  काँग्रेसप्रणित यूपीए २४ ते ३८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. तामिळनाडूत लोकसभेच्या एकूण ३९ पैकी ३८ जागांसाठी मतदान झाले आहे.

    19:25 (IST)19 May 2019
    आंध्र प्रदेशमध्ये वायएसआरची बाजी ?

    इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलनुसार आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी वायएसआरला १८ ते २० जागांवर,  तेलगू देसम पक्षाला ४ ते ६ जागांवर,  विजय मिळण्याची शक्यता. 

    19:19 (IST)19 May 2019
    केरळमध्ये एनडीएच्या खात्यात एक जागा

    इंडिया टुडे- अॅक्सिस My India च्या एक्झिट पोलनुसार रळमध्ये एनडीएला फक्त एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता. तर यूडीएफला १५ ते १६ आणि एलडीएफला ३ ते ५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता.

    19:11 (IST)19 May 2019
    बिहारमध्ये भाजपा- जदयूची बाजी ?

    टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी एनडीएला- ३०, यूपीएला- १० जागांवर विजय मिळण्याची शक्यता.

    19:10 (IST)19 May 2019
    एबीपी- नेल्सनचा एक्झिट पोल काय सांगतो ?

    एबीपी - नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार भाजपाप्रणित एनडीएला २६७, काँग्रेसप्रणित यूपीएला १२७, सपा- बसपाला ५६ आणि अन्य पक्षांना८४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. 

    19:05 (IST)19 May 2019
    महाराष्ट्रात काय होणार ?

    महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून 'एबीपी- नेल्सन'च्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी १७ तर काँग्रेस - ४, राष्ट्रवादी काँग्रेस - ९ आणि  महाराष्ट्र स्वाभिमानीला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता.   वाचा सविस्तर>>

    18:59 (IST)19 May 2019
    टाइम्स नाऊ- व्हीएमआरचा एक्झिट पोल काय सांगतो ?

    टाइम्स नाऊ- व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार ५४२ पैकी भाजपाप्रणित एनडीएला ३०६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता. तर काँग्रेसप्रणित यूपीएला १३२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता

    18:54 (IST)19 May 2019
    गुजरातमध्ये भाजपाचे वर्चस्व?

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमधील २६ जागांपैकी २५ जागांवर भाजपा तर एका जागेवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता

    18:52 (IST)19 May 2019
    भाजपा राखणार गोव्याचा गड ?

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार गोवा येथे मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा गड कायम राखणार असे दिसते.  गोवा येथील दोन्ही जागांवर भाजपा विजयी होणार असा अंदाज वर्तवण्यात जात आहे.

    18:52 (IST)19 May 2019
    भाजपा राखणार गोव्याचा गड ?

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार गोवा येथे मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा गड कायम राखणार असे दिसते.  गोवा येथील दोन्ही जागांवर भाजपा विजयी होणार असा अंदाज वर्तवण्यात जात आहे.

    18:46 (IST)19 May 2019
    सुरुवातीच्या कलानुसार एक्झि पोलमध्ये भाजपा आघाडीवर

    एक्झिट पोलचे सुरुवातीचे कल पाहता भाजपा आघाडीवर आहे.  भाजपाप्रणित 'रालोआ' ९४ ते १०३  तर काँग्रेस प्रणित यूपीए १० ते १९ जागांवर आघाडीवर.  सध्या ५४२ पैकी ११३ जागांवरील एक्झिट पोलचा अंदाज जाहीर

    18:44 (IST)19 May 2019
    उत्तर प्रदेशात बसपाच्या हत्तीला बळ मिळणार ?

    उत्तर प्रदेशमध्ये २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बसपा दमदार पुनरागमन करणार असल्याचे दिसते. बहुजन समाज पक्षाला ३० जागा मिळण्याची शक्यता. तर समाजवादी पक्षाला २६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता.

    18:40 (IST)19 May 2019
    राजस्थानमध्ये भाजपाला अच्छे दिन?

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये २५ पैकी २३ जागा भाजपाला तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता.

    18:38 (IST)19 May 2019
    छत्तीसगडमध्ये काय होणार ?

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये ११ पैकी भाजपाला ७ ते ८ जागा तर काँग्रेसला ३ ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

    18:33 (IST)19 May 2019
    मध्य प्रदेशमध्ये भाजपाला २२ ते २६, काँग्रेसला १ ते ३ जागा

    इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार  मध्य प्रदेशमध्ये भाजपाला २२ ते २६, काँग्रेसला १ ते ३ जागा मिळण्याची शक्यता, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. 

    18:32 (IST)19 May 2019
    उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा हादरा

    उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. एबीपी- नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार सपा- बसपा - ५६, काँग्रेस - २ आणि भाजपाप्रणीत एनडीए- २२ जागा मिळण्याची शक्यता

    18:08 (IST)19 May 2019
    संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६०. २१ टक्के मतदान
    17:56 (IST)19 May 2019
    एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?

    बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं. वाचा सविस्तर>>

    17:55 (IST)19 May 2019
    २०१४ मधील एक्झिट पोल काय होते ?

    २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएचा विजय होणार असे म्हटले होते. बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपाला यश येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, निकालात भाजपा एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळाल्याचे दिसून आले. एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला २६० ते २८९ जागा मिळतील, असा अंदाज होता. तर काँग्रेसप्रणित यूपीएला ९० ते ११० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात २०१४ मध्ये 'एनडीए'ने तब्बल ३३६ चा आकडा गाठला. तर यूपीएला फक्त ६० जागांवरच समाधान मानावे लागले.

    17:53 (IST)19 May 2019
    या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

    गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एक्झिट पोलबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण एक्झिट पोलमधील अंदाज प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतात. काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलमधील अंदाज चुकल्याचे समोर आले असून या निवडणुकांचा घेतलेला आढावा…  वाचा सविस्तर>>

    17:44 (IST)19 May 2019
    एक्झिट पोल म्हणजे काय ?

    एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? वाचा सविस्तर>>

    एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Lok sabha election exit poll 2019 live updates bjp congress c voter chanakya narendra modi rahul gandhi
    First published on: 19-05-2019 at 17:39 IST