Lok Sabha Election 2019 North India Live : उत्तर भारताने पुन्हा एकदा मोदी सरकारला कौल दिला आहे. गत २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतात मोदी लाटेचा प्रभाव दिसून आला. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष मोदी लाटेमध्ये निष्प्रभ ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशात बुआ-भतिजा म्हणजे मायावती आणि अखिलेश यादव यांची आघाडी भाजपासमोर मोठी अडचण निर्माण करेल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात उलटेच घडले. भाजपाला ५५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली तर सपा-बसपा आघाडीला फक्त फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसच्या वाटयाला फक्त एक जागा जाऊ शकते.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आघाडीचा भाजपा-जदयू आघाडीने दारुण पराभव केला आहे. बिहारमध्ये ४० पैकी फक्त एक किंवा दोन जागा राजदला मिळू शकतात. मध्य प्रदेशात २९ पैकी २८ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. गुजरातमध्ये २६ पैकी २६ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.

एकूणच संपूर्ण उत्तर भारताने २०१४ सारखाच कौल दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छ्त्तीसगड या तीन राज्यात भाजपाला पराभूत करुन काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. विधानसभेच्या निकालाचा हा कल लोकसभेमध्ये मात्र उलटला. असे सहसा होत नाही. पण या तीन राज्यातील जनतेने लोकसभेसाठी मोदींना पसंती दिली. निवडणुकांच्या या निकालातून मोदी लाट कायम असल्याचे दिसून आले.

Live Blog

उत्तर भारतातील लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा

Highlights

    18:25 (IST)23 May 2019
    स्मृती इराणी ३८ हजार मतांनी आघाडीवर

    अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी मोठी आघाडी घेतली असून त्या ३८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आझमगडमधून ४ लाख १३ हजार २९३ मतांनी आघाडीवर आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्या दोन लाख ७८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विजय मिळवला आहे

    16:39 (IST)23 May 2019
    स्मृती इराणी १९ हजार मतांनी आघाडीवर

    अमेठीमध्ये स्मृती इराणी यांची आघाडी हळूहळू वाढत चालली. स्मृती इराणी आता १९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आझमगडमधून १ लाख २७ हजार १०० मतांनी आघाडीवर आहे. उन्नावमधून साक्षी महाराज विक्रमी चार लाख मतांनी विजयी झाले आहेत

    16:22 (IST)23 May 2019
    अनुभवापेक्षा लोक अभिनेत्यांना का निवडतात ? - अमरिंदर सिंग

    पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे. कारण इथून अभिनेता सनी देओल भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस उमेदवार सुनील जाखर पिछाडीवर आहेत. त्यासंबंधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले की, सुनील जाखर यांनी भरपूर काम केले आहे. अनुभवापेक्षा लोक अभिनेत्यांना का प्राधान्य देतात ते आपल्याला समजलेले नाही.

    14:16 (IST)23 May 2019
    स्मृती इराणी ९ हजार मतांनी आघाडीवर

    अमेठीमधून भाजपाच्या स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. स्मृती इराणी नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत. रामपूरमधून अभिनेत्री जया प्रदा पिछाडीवर असून समाजवादी पार्टीचे आझम खान आघाडीवर आहेत. अलाहाबादमध्ये आठ फेऱ्यांनंतर रिटा जोशी ५४,३७४ मतांनी आघाडीवर आहेत. पंतप्रधान मोदी २ लाख ५१ हजार ५८७ मतांनी आघाडीवर आहेत.

    14:04 (IST)23 May 2019
    सावित्री बाई फुलेंचे डिपॉझिट जप्त होण्याची स्थिती

    बहराईचमधील भाजपाच्या बंडखोर उमेदवार सावित्री बाई फुले यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी स्थिती आहे. त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे अक्षयबार लाल यांना ४ लाख ६७ हजार ६१५ मते मिळाली आहेत. सपाच्या शब्बीर वाल्मिकी यांना ३ लाख ५६ हजार ९३७ मते मिळाली असून सावित्री बाई फुले यांना फक्त ३२,४४३ मते मिळाली आहेत.

    13:00 (IST)23 May 2019
    साक्षी महाराज दोन लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर

    उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून अपना दलच्या अनुप्रिया पटेल आठव्या फेरीअखेर ३३ हजार मतांनी आघाडीवर. अपना दल भाजपाचा मित्र पक्ष आहे. उन्नावमधून साक्षी महाराज तब्बल २ लाख ३३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीतून २ लाख ६३ हजार ५८३ मतांनी आघाडीवर आहेत.

    12:18 (IST)23 May 2019
    ऑस्ट्रेलियाच भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन

    एक्झिट पोलचे आकडे चुकीचे ठरु शकतात यासाठी ऑस्ट्रेलियाचे उदहारण दिले जात होते. पण आता त्याच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि मेलबर्न शहरातील भाजपा समर्थकांनी भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरु केले आहे. भाजपा २९२ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसताच सेलिब्रेशनला सुरुवात झाली.

    12:07 (IST)23 May 2019
    साध्वी प्रज्ञा ५० हजार मतांनी आघाडीवर

    भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. साध्वी प्रज्ञा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत. निश्चित माझा विजय होईल, माझ्या विजयात धर्माचा विजय होईल. अधर्माचा नाश होईल. मी भोपाळच्या जनतेची आभारी आहे.

    11:24 (IST)23 May 2019
    अमेठीत स्मृती इराणींची आघाडी

    उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. प्रत्येक फेरीच्या मतगणनेनंतर आकडे सातत्याने बदलत आहेत. सध्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना मागे टाकत ४,३०० मतांची आघाडी घेतली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. 

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

    10:57 (IST)23 May 2019
    भाजपा अध्यक्ष अमित शाह सव्वा लाख मतांनी आघाडीवर

    भाजपाचे अध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून १ लाख २५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. मेहबूबा मुफ्ती तिसऱ्या स्थानावर आहे. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा असून भाजपा नऊ आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.

    10:35 (IST)23 May 2019
    उत्तर भारतात पुन्हा मोदी लाट? सपा, बसप, काँग्रेसचा संघर्ष

    उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. या राज्यांमध्ये २०१४ सारखे चित्र आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार कल दिसत आहेत. उत्तर प्रदेशात बुआ-भतिजा म्हणजे मायावती आणि अखिलेश यादव यांची आघाडी भाजपासमोर मोठी अडचण निर्माण करेल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात अजूनपर्यंत असे चित्र दिसलेले नाही.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

    10:12 (IST)23 May 2019
    शत्रूघ्न सिन्हा पिछाडीवर

    पटना साहिबमधून भाजपाचे रवि शंकर प्रसाद आघाडीवर, काँग्रेसचे शत्रूघ्न सिन्हा पिछाडीवर.

    10:09 (IST)23 May 2019
    मोदी-शाह यांना मोठी आघाडी

    वाराणसीतून पंतप्रधान मोदी २० हजार मतांनी तर भाजपा अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून ५० हजार मतांनी आघाडीवर.

    09:46 (IST)23 May 2019
    दिल्लीत चार जागांवर भाजपाला आघाडी

    निवडणूक आयोगाच्या अधिकृत कलानुसार दिल्लीच्या सात जागांपैकी भाजपा चांदनी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

    09:42 (IST)23 May 2019
    भाजपाला देशभरात मोठी आघाडी

    निवडणूक आयोगाकडून अधिकृत कल हाती आले आहेत. त्यानुसार भाजपा २२९ जागांवर तर काँग्रेस ५६ जागांवर आघाडीवर आहे.

    09:41 (IST)23 May 2019
    मनेका गांधी पिछाडीवर

    उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमधून केंद्रीय मंत्री मनेका गांधी पिछाडीवर असून त्यांचा मुलगा वरुण गांधी पीलीभीतमधून आघाडीवर आहे.

    09:22 (IST)23 May 2019
    बेगुसरायमधून गिरीराज सिंह आघाडीवर

    बिहारच्या बेगुसरायमधून भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह आघाडीवर असून सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत.

    09:14 (IST)23 May 2019
    दक्षिण आणि पश्चिम दिल्लीतून भाजपाला आघाडी

    दक्षिण दिल्लीतून भाजपाचे रमेश बीधुरी आणि पश्चिम दिल्लीतून भाजपाचे परवेश वर्मा आघाडीवर आहेत.

    09:13 (IST)23 May 2019
    सोनिया-राहुल आघाडीवर

    काँग्रेसचे अध्यक्ष राहुग गांधी केरळच्या वायनाड तर सोनिया गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून आघाडीवर आहेत.

    09:04 (IST)23 May 2019
    मध्य प्रदेशात काँग्रेस नेते पिछाडीवर

    मध्य प्रदेशातील वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह भोपाळमधून, ज्योतिरादित्य सिंधिया गुनामधून आणि विवेक तनखा जबलपूरमधून पिछाडीवर आहेत.

    09:00 (IST)23 May 2019
    गुरदासपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

    पंजाबच्या गुरदासपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे सगळयांचे लक्ष आहे. कारण इथून भाजपाकडून अभिनेते सनी देओल आणि काँग्रेसकडून सुनील जाखर यांच्यात लढत आहे.

    08:56 (IST)23 May 2019
    साध्वी प्रज्ञा सिंह आघाडीवर


    सर्वांचे लक्ष लागलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांची काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याबरोबर लढत आहे.

    08:48 (IST)23 May 2019
    जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

    गोरखपूरमधून भाजपाचे रवि किशन, गाझियाबादमधून माजी लष्कर प्रमुख व्ही.के.सिंह आघाडीवर.

    08:46 (IST)23 May 2019
    चंदीगडमध्ये मतमोजणीला सुरुवात

    चंदीगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पवन कुमार बन्सल, भाजपाच्या किरण खेर आणि आपचे हरमोहन धवन निवडणूक लढवत आहेत.

    08:36 (IST)23 May 2019
    मध्य प्रदेशातही भाजपाला मोठी आघाडी

    विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. पण लोकसभेला मध्य प्रदेशच्या जनतेने मोदींना साथ दिल्याचे दिसत आहे. इथे लोकसभेच्या २२ जागांवर भाजपा तर काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.

    08:34 (IST)23 May 2019
    बिहारामध्ये जदूय-भाजपाची सरशी

    बिहारमध्ये प्रारंभीचे कल हाती आले असून  भाजपा नऊ जागांवर आघाडीवर तर राजद-काँग्रेसने खातेही उघडलेले नाही.

    08:32 (IST)23 May 2019
    भाजपा आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई

    उत्तर प्रदेशात भाजपा आठ, सपा-बसपा-आरएलडी सात आणि काँग्रेसकडे तीन जागांची आघाडी.

    08:21 (IST)23 May 2019
    दिल्लीत मतमोजणी सुरु

    दिल्लीच्या सिरी फोर्ट कॉम्पलेक्समध्ये मतमोजणीला सुरुवात.

    08:16 (IST)23 May 2019
    उत्तर प्रदेशात पहिल्या आठ जागांचे कल

    भाजपा तीन, सपा-बसपा-आरएलडी दोन आणि काँग्रेसला तीन जागांवर आघाडी

    उत्तर भारतातील लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा
    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Lok sabha election result 2019 north india live updates up mp bihar rajasthan
    First published on: 23-05-2019 at 08:01 IST