Lok Sabha Election 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण भारतातून १३० जागा आहेत. कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होती. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. त्यापैकी भाजपा २४ जागांवर भाजपा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे नेत चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने क्लिन स्वीप केलं आहे.

तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. डीमके आणि काँग्रेस आघाडी तामिळनाडूत ३६ जागांवर विजयी तर एआयएडीएमकेनं २ जागा  मिळवल्या आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत पण या राज्यात वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची कारवाई झाली होती. तामिळनाडूत एम. करुणानिधी आणि जयललिता या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर राज्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. गेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाने ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा फडकवला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला शह देण्यासाठी एम. करुणानिधींची डीएमके पार्टी संपूर्ण ताकदीनीशी रिंगणात उतरली.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंटने २० पैकी १९ जागांवर विजय मिळवला आहे. तर तेलंगणामधल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला यश मिळालं आहे.

Live Blog

दक्षिण भारतातील लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा

17:49 (IST)23 May 2019
एच डी कुमारस्वामी यांच्या मुलाला मागे टाकत सुमनलता १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर

कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सुमनलता अंबरिश तब्बल १ लाख २६ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुत्र निखिल पिछाडीवर आहेत. सुमनलता या जेडीएसचे दिवंगत नेते अंबरिश यांच्या पत्नी आहेत. एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी काँग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त उमेदवार आहेत.  

16:39 (IST)23 May 2019
केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी जवळपास आठ लाख मतांनी आघाडीवर.

केरळातील वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जवळपास आठ लाख मतांनी आघाडीवर. डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही काऴापासून जनक्षोभ उसळला होता. याचा फायदा भाजपाने उठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने राज्यातील लढती रंगतदार झाली होती. 

16:27 (IST)23 May 2019
कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी पराभव केला मान्य

कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी पराभव मान्य केला. 'गुलबर्गाचे निकाल आम्ही स्वीकारतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. झालेल्या चुका कशा ठीक कराव्यात आणि पक्षाला बळकट कसं करावं यावर आम्ही विचार करू,' असं ते म्हणाले.

16:19 (IST)23 May 2019
मोदींकडून जगनमोहन रेड्डी यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगनमोहन रेड्डी यांना तेलुगू भाषेत शुभेच्छा दिल्या. आंध्र प्रदेशप्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. 

 

15:12 (IST)23 May 2019
कर्नाटकमध्ये भाजपाकडून काँग्रेस-जेडीएसला धोबीपछाड

कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होती. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. त्यापैकी भाजपा २४ जागांवर आघाडीवर आहे.

14:41 (IST)23 May 2019
तेलंगण राष्ट्र समिती ८ जागांवर आघाडीवर

तेलंगणातील १७ जागांपैकी तेलंगण राष्ट्र समिती ८ जागांवर आघाडीवर आहे. तर टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता पिछाडीवर आहे.

14:22 (IST)23 May 2019
माझ्या गालावर सणसणीत चपराक- प्रकाश राज

सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज राजकारणाच्या आखाड्यात उतरले खरे पण लोकसभा निवडणुकीत ते पराभवाच्या मार्गावर आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट केलं आहे. 'माझ्या चेहऱ्यावर ही सणसणीत चपराक आहे,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

13:42 (IST)23 May 2019
आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंना धक्का, वायएसआरची मुसंडी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे नेत चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. विधानसभेच्या १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४९ तर टीडीपीने केवळ २५ जागांवर आघाडी घेतली आहे. जनसेना पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे. आंध्रात जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करताना दिसत आहे. 

13:05 (IST)23 May 2019
के चंद्रशेखर राव यांची कन्या कविता पिछाडीवर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या कविता निझामाबाद मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार धर्मपुरी अरविंद ३१ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

12:27 (IST)23 May 2019
हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसी आघाडीवर 

हैदराबाद मतदार संघातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ८५ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर 

12:02 (IST)23 May 2019
तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसची जोरदार मुसंडी

तामिळनाडूतील चेन्नई येथील द्रमुक मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.  डीमके आणि काँग्रेस आघाडी तामिळनाडूत ३६ जागांवर आघाडीवर आहे तर एआयएडीएमके २ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत पण या राज्यात वेल्लोरची निवडणूक रद्द करण्याची कारवाई झाली होती. तामिळनाडूत एम. करुणानिधी आणि जयललिता या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर राज्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाने ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा फडकवला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला शह देण्यासाठी एम. करुणानिधींची डीएमके पार्टी संपूर्ण ताकदीनीशी रिंगणात उतरली.

11:30 (IST)23 May 2019
शशी थरूर १३ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर

तिरुवअनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शशी थरूर यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. १३ हजारांहून अधिक मतांनी ते आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजशेखरन आहेत. दोन वेळा या मतदार संघातून निवडून आलेले शशी थरुर यंदा विजयाची हॅटट्रिक करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

10:36 (IST)23 May 2019
कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सुमनलता अंबरिश आघाडीवर

कर्नाटकातील मांडया मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल यांना मागे टाकत अपक्ष उमेदवार सुमनलता अंबरिश १२०० मतांनी आघाडीवर आहेत. सुमनलता या जेडीएसचे दिवंगत नेते अंबरिश यांच्या पत्नी आहेत. एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी काँग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त उमेदवार आहेत.  

10:06 (IST)23 May 2019
काँग्रेसचे कार्ती चिदंबरम आघाडीवर

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघातून आघाडीवर

09:55 (IST)23 May 2019
कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल आघाडीवर

कर्नाटकातील मांडया मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल आघाडीवर

09:33 (IST)23 May 2019
भाजपाचे तेजस्वी सूर्या आघाडीवर

बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून भाजपाचे तेजस्वी सूर्या आघाडीवर

09:11 (IST)23 May 2019
राहुल गांधी आघाडीवर

केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर

08:53 (IST)23 May 2019
मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर

कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर

08:47 (IST)23 May 2019
शशी थरुर पिछाडीवर

तिरुवअनंतपुरम मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शशी थरुर पिछाडीवर

दक्षिण भारतातील लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे वाचा