पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ एप्रिलला वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरतेवेळी मोदींबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह भाजपाशासित राज्यातील अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. २०१४ प्रमाणेच यावेळीही मोदी हे अर्ज भरण्यापूर्वी २५ एप्रिलला लंका येथून दशाश्वमेध घाटापर्यंत सुमारे १० किमी लांब रोड शो करुन शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ एप्रिल रोजी बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरतील.
वाराणसीतील सुरूवातीच्या तीन निवडणुका वगळता १९८४ पासून आतापर्यंत तीन दशकांहून अधिक काळापासून काँग्रेसने फक्त एकदाच विजय नोंदवला आहे. १९९१ पासून आतापर्यंत फक्त २००४ची निवडणूक वगळता भाजपाचाच विजय झाला आहे.
वाराणसी मतदारसंघातील २०१४ ची निवडणूक रंगतदार ठरली होती. कारण भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी हे येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांना आव्हान देण्यासाठी आपचे अरविंद केजरीवाल हे दिल्लीवरुन वाराणसी येथे आले होते. मोदींनी केजरीवाल यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 4:47 pm