News Flash

रुपये १,४७,००,००,००० – गंभीरची संपत्ती

पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून गंभीरला उमेदवारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानात नवीन इनिंग सुरु केली आहे. भाजपातर्फे गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या गौतम गंभीर जोरदार प्रचारही करतोय. निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गौतम गंभीर दिल्लीतला सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेला आहे.

२०१७-१८ सालात गौतम गंभीरने आपल्या प्राप्तिकर परताव्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे १२.४० कोटी एवढं दाखवलं आहे. याचसोबत गौतम गंभीरची पत्नी नताशा गंभीरनेही आपलं वार्षिक उत्पन्न ६.१५ लाख इतकं दाखवलं आहे. याव्यतिरीक्त गौतम गंभीरच्या घरी ५ चारचाकी गाड्या तर एक दुचाकी गाडी आहे. प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेनुसार गंभीरच्या नावावर १४७ कोटींची संपत्ती आहे.

पश्चिम दिल्ली मतदारसंघातून निवडणुक लढवणारे काँग्रेसचे महाबली मिश्रा गौतम गंभीरनंतर दुसरे श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. मिश्रांची संपत्ती ही ४५ कोटींच्या घरात आहे. तर काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लढणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंहच्या नावावर १२.१४ कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे या लढतीत कोणते उमेदवार बाजी मारतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2019 3:03 pm

Web Title: lok sabha elections 2019 with assets worth rs 147 cr gautam gambhir richest of all delhi candidates
Next Stories
1 साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलासा, उमेदवारीविरोधातील याचिका फेटाळली
2 ‘स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं?’; मोदी म्हणतात…
3 मोदी सरकारने आश्वासन पूर्ण केली नाहीत, राष्ट्रवादीची टीका
Just Now!
X