लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील एकूण ५१ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवारांचे भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत. पाचव्या टप्प्यातील ५१ मतदारसंघांपैकी ३८ मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशात १४, राजस्थानमध्ये १२, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात, बिहारमध्ये पाच, झारखंडमध्ये चार जागांसाठी मतदान होत आहे.

Live Blog

15:16 (IST)06 May 2019
धोनीने बजावला मतदानाचा हक्क

रांचीच्या जवाहर विद्या मंदिरमध्ये महेंद्रसिंह धोनीने केले मतदान

13:42 (IST)06 May 2019
वडिलांच्या अंत्यविधीनंतर मुलाने केले मतदान

मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे वडिलांचा  अंत्यविधी करुन आल्यानंतर मुलाने मतदानाचा हक्क बजावला.

13:31 (IST)06 May 2019
दुपारी एक वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

बिहारमध्ये २४ टक्के आणि राजस्थानमध्ये ३३ टक्के मतदान

12:42 (IST)06 May 2019
लेहमध्ये २० टक्के मतदान

जम्मू-काश्मीरच्या लेह जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.८८ टक्के मतदान.

12:41 (IST)06 May 2019
मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप

हरचंदपूरच्या बूथ नंबर ३४८, ३४९ आणि ३५० वर भाजपाचे पोलिंग एजंट आणि गावचा प्रमुख भाजपाला मतदान करण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचा रायबरेलीच्या जिल्हा काँग्रेस समितीचा आरोप.

12:35 (IST)06 May 2019
आशुतोष राणांनी केले मतदान

मध्य प्रदेशात गादावारा येथील मतदान केंद्रावर अभिनेते आशुतोष राणा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

11:50 (IST)06 May 2019
स्मृती इराणींचा आरोप

स्मृती इराणींचा राहुल गांधींवर मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा आरोप

11:47 (IST)06 May 2019
राहुल गांधी पोहोचले अमेठीत

अमेठीमध्ये राहुल गांधी आणि भाजपाच्या स्मृती इराणीमध्ये थेट लढत आहे. 

10:48 (IST)06 May 2019
सकाळी १० वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

सकाळी १० वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी.

10:46 (IST)06 May 2019
ईव्हीएम मशीनची तोडफोड

बिहारच्या छपरामध्ये १३१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची तोडफोड, रणजीत पासवान नावाच्या आरोपीला अटक.

10:43 (IST)06 May 2019
मतदानासाठी आईला खाद्ंयावरुन उचलून आणले

झारखंडच्या हजारीबागमध्ये एका माणसाने आपल्या १०५ वर्षाच्या आईला खांद्यावरुन उचलून मतदानासाठी आणले होते.

10:11 (IST)06 May 2019
लखनऊ : महागठबंधनचे इथे आव्हान नाही - राजनाथ सिंह

लखनऊमध्ये महागठबंधनचे भाजपाला आव्हान नाही, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे उमेदवार राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सपा-बसपा-आरएलडीच्या उमेदवार पुनम सिन्हा यांच्याबाबत मला काहीही बोलायचे नाही. कारण, निवडणुका या उमेदवार कोणता यावर नाही तर प्रश्नांवर लढल्या जातात, असे ते म्हणाले.


10:06 (IST)06 May 2019
झारखंड : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार जयंत सिन्हा मतदानासाठी केंद्रावर दाखल
10:01 (IST)06 May 2019
झारखंड : १०५ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क
09:38 (IST)06 May 2019
प्रियंका गांधी नवऱ्याचे नाव कमी आणि माझे नाव जास्त उच्चारतात

पाच वर्षांपूर्वी प्रियंका गांधींना माझे नाव माहित नव्हते. पण सध्या त्या सतत माझे नाव घेत असतात. नवऱ्याचे नाव कमी आणि माझे नाव जास्त उच्चारत असतात - स्मृती इराणी

09:35 (IST)06 May 2019
पुलवामामध्ये मतदान केंद्रावर ग्रेनेडचा स्फोट

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका मतदान केंद्रावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला.

09:01 (IST)06 May 2019
पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवारावर हल्ला

बाराकपोर येथील भाजपा उमेदवार अर्जुन सिंह यांनी तृणमुल कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला.

08:52 (IST)06 May 2019
पुलवामामध्ये मतदानासाठी रांग

अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुलवामामध्ये एका मतदान केंद्रावर मतदानासाठी लागलेली रांग.

08:49 (IST)06 May 2019
मायावतींनी केले मतदान

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी बजावला मतदानाचा हक्क.

07:47 (IST)06 May 2019
राजनाथ सिंह यांनी केले मतदान

केंद्रीय मंत्री आणि लखनऊमधील भाजपा उमेदवार राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला.

07:45 (IST)06 May 2019
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड उदभवल्याने पश्चिम बंगालच्या हावडामध्ये २८९/२९१/२९२ बूथवर अजून मतदान सुरु झालेले नाही.

07:42 (IST)06 May 2019
राज्यवर्धन राठोड मतदान केंद्रावर

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड पत्नीसोबत मतदानासाठी जयपूरमधल्या मतदान केंद्रावर पोहोचले.

07:38 (IST)06 May 2019
माजी केंद्रीय मंत्री मतदानासाठी रांगेत

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांचा मुलगा आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा झारखंडमधून निवडणूक लढवत आहे.