२०१४ पाठोपाठ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांच्या सरकारने मोठा पल्ला गाठला आहे. ३५२ जागांचा आकडा गाठत भाजपने यंदा पुन्हा एकदा विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय नेते, विरोधी पक्षनेते मोदींचं अभिनंदन करत आहेत.

विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारत मोठी उंची गाठेल असा विश्वास विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर व्यक्त केला आहे.

सलग दुसऱ्या वेळी विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय. याच दिवशी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकत भारतीयांना आणखी एक आनंदाची बातमी देण्याची जबाबदारी विराट कोहलीच्या संघावर असणार आहे.

अवश्य वाचा – राजकारणाची पहिलीच इनिंग गंभीरने गाजवली, ‘आप’च्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करुन विजयी