30 September 2020

News Flash

परदेशातील भारतीयांचे भाजपासाठी अनोखे अभियान

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा प्रमुख देशांमध्ये हे अभियान सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणूक २०१९साठी भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी भारतातच नव्हे तर परदेशातही भाजपा कार्यकर्त्यांनी ‘एक कॉल देश के नाम’ असे अनोखे अभियान सुरू केल्याची माहिती ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया ओव्हरसीज’ संघटनेचे सह सरचिटणीस संतोष कुमार गुप्ता यांनी सोमवारी मुंबईत दिली. भारतीय जनता प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

संतोष कुमार गुप्ता म्हणाले की, ‘एक कॉल देश के नाम’ हे अभियान परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांमार्फत चालवले जाते. एकूण १५ देशामध्ये हे अभियान सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा प्रमुख देशांमध्ये हे अभियान सुरू आहे.

या अभियाना अंतर्गत परदेशातील भारतीय मोदी आणि भाजपाला पुन्हा संधी का द्यावी हे सांगतात तसेच मोदी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेतील लाभार्थ्यांचे अनुभव शेअर करतात. तसेच ते भारतातील आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन करतात. कॉल पे चर्चा या उपक्रमात भाजपा निवडणूक उमेदवार यांच्याशी फोनवर थेट संवाद साधतात.

परदेशातील जवळपास ८ ते १० हजार कार्यकर्ते भारतात प्रचारासाठी येणार असल्याचे सांगत फेसबुकवरही या अभियानासाठी ‘इंडिया फॉर २०१९’ असे पेज तयार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 5:49 pm

Web Title: loksabha election 2019 nri campaigning for bjp
Next Stories
1 भाजपाने उमेदवारी दिलेले मनोज कोटक आहेत तरी कोण?
2 ‘लाज कशी वाटत नाही’ हे विचारायलाच तुम्हाला लाज कशी वाटत नाही – विनोद तावडे
3 उदयनराजेंच्या मिरवणुकीत चोरट्यांचा प्रताप, ११ लाखांचा ऐवज लंपास
Just Now!
X