News Flash

काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे पैसे खाऊन झोपी जाणारा कुंभकर्ण- नरेंद्र मोदी

‘वोट बँक पॉलिटिक्स’साठी काँग्रेसने हिंदू समाजाला दहशतवादाचा खोटा डाग लावण्याचे काम केले.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. सत्तेत असताना सहा महिने झोपतात आणि जागे झाल्यावर पैसे खाऊन पुन्हा झोपतात. सिंचन, मुद्रांक, रिअल इस्टेट, सरकारी टेंडर असे जेथे शक्य तेथे त्यांनी करोडो, अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत विराट जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. महायुतीचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर (चंद्रपूर), खा. रामदास तडस (वर्धा), खा. आनंद अडसूळ (अमरावती) व खा. अशोक नेते (गडचिरोली) उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. विकास महात्मे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे व अनंतराव गुढे उपस्थित होते.

धरणात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवार यांनी काय उत्तर दिले विसरता येणार नाही. मावळात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश पवार परिवाराने दिला. शेतकऱ्यांचा नावाखाली सिंचनाचे प्रकल्प आणले पण त्यातही काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने लुटले. विदर्भातील दुष्काळ हा काँग्रेसच्या ७० वर्षांच्या भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाभेसळ आघाडी जवानांच्या शौर्याचे पुरावे मागून त्यांना अपमानित करतात. अशा विकासविरोधी आणि जनता विरोधी नेत्यांना बरखास्त करण्याची वेळ आली आहे.

‘वोट बँक पॉलिटिक्स’साठी काँग्रेसने हिंदू समाजाला दहशतवादाचा खोटा डाग लावण्याचे काम केले. शांतताप्रिय हिंदू समाजाला दहशतवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला जनता कधीही माफ करणार नाही. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्व 48 मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथे केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 7:08 pm

Web Title: loksabha election 2019 pm modi criticizes ncp and congress in vardha
Next Stories
1 ‘शरद पवार आणि अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही’
2 ‘नमो’च्या ‘दूरदर्शना’वर काँग्रेसचा आक्षेप
3 मी जन्मतः शिवसैनिक, चौकीदार होण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे
Just Now!
X