औरंगजेब, रावण, हिटलर, दुर्योधन आणि गंगू तेली… असी टीका करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरुक्षेत्रावरून प्रतिहल्ला करत चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने माझ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. त्यांनी माझ्या आईला देखील सोडले नाही. काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याने मला ‘गंदी नाली का किडा’ असेही संबोधित केले. काहींनी मला दाऊद इब्राहिम, रावण, साप, विंचू, घाणेरडा माणूस, मौत का सौदागर, हिटलर आणि मुसोलिनी म्हणत शिव्या दिल्या. माझे वडिल कोण आहेत? असे विचारत विरोधकांनी माध्या आत्मसन्माला धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे. मी पंतप्रधान झालो, हे अनेकांना पाहवंल नाही. त्यांनी माझी मूर्ख पंतप्रधान म्हणून संभावना केली. मला जवानांच्या टाळूवरचं लोणी खाणारा दलाल म्हटंल गेलं. पंतप्रधान झाल्यापासून मला शिव्या देत आहेत. असा संताप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरूक्षेत्र येथील प्रचार सभेत केला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी असा दावा केला की, मी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार थांबवल्यामुळे आणि घराणेशाहीवर टीका केल्यामुळे माझ्यावर असे आरोप केले जात आहेत. त्यामुळेच काँग्रेसने माझी तुलना दाऊद, हिटलर, मुसोलिनीसोबत तुलना केली आहे. याच लोकांनी भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. मोदींच्या या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरमार्फत प्रतिक्रिया देताना ‘मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असं प्रत्युत्तर दिलं होतं. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावरून टीकाचे सत्र सुरू झाले आहे.