20 September 2020

News Flash

जाणून घ्या पार्थ पवार यांच्या पराभवाची ६ कारणं….

शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंचा विजय

संग्रहित छायाचित्र

पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी भरघोस मताधिक्य मिळवत आपली जागा कायम राखली आहे. पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सर्व ताकद पार्थ यांच्या मागे लावली होती. खुद्द अजित पवार आणि राष्ट्रवादीचे बडे नेते पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये होते.

या तुलनेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा प्रचारामध्ये फारसा जोर दिसला नाही. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारणे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आपली आघाडी कायम ठेवली होती. श्रीरंग बारणे यांनी अंदाजे ७ लाख ११ हजार तर पार्थ पवार यांना ४ लाख ९७ हजारांच्या घरात मतं मिळाली.

अवश्य वाचा – निकालांचं राज ठाकरेंकडून एका शब्दात विश्लेषण, म्हणाले….

प्रसारमाध्यमांकडून भरघोस प्रसिद्धी मिळवूनही पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत अपयशी का ठरले याची काही कारणं सांगता येतील.

१) मतदार संघाची माहिती नसलेला आणि केवळ शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा येवढीच ओळख

२) पिंपरी-चिंचवड किंवा मावळ लोकसभा मतदार संघात यापूर्वी संपर्क नाही

३) प्रचारात प्रभाव पाडता आला नाही

४)राष्ट्रवादी पक्षातील गटा-तटाची एकजूट होऊन ही त्याच परिवर्तन मतात करता आला नाही

५) वंचित बहुजन चे उमेदवार राजाराम पाटील यांना मिळालेल्या मतांचा फटका बसला

६) पार्थ हे तरुण असुनही त्यांना युवकांची मत वळवण्यात अपयश आले

मात्र दुसरीकडे प्रचारामध्ये फारसा जोर नसतानाही श्रीरंग बारणे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. बारणे यांच्या विजयाची काही कारणं सांगता येतील.

१) श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन

२)श्रीरंग बारणे यांची ५ वर्ष झालं मतदार संघावरील मजबूत पकड,परिसरातील प्रश्न माहीत होते,घरोघरी नाव पोहचलेल होतं

३) श्रीरंग बारणे यांना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता तो मावळला

४) शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार केला.त्याचा फायदा बारणे यांना झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 5:22 pm

Web Title: loksabha election 2019 results reasons behind ncp candidate parth pawar from maval constituency
Next Stories
1 अमोल कोल्हे विजयी, १५ वर्षानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा झेंडा
2 साक्षी महाराजांनी मोडला आपलाच विक्रम, चार लाख मतांनी विजयी
3 निकालांचं राज ठाकरेंकडून एका शब्दात विश्लेषण, म्हणाले….
Just Now!
X