24 January 2020

News Flash

Loksabha Voting: देशात सरासरी ६३ टक्के, महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान

Loksabha Voting: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी देशभरात सरासरी ६३.२४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झाले. 

Loksabha Voting: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी देशभरात सरासरी ६३.२४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झाले.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसरीकडे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका निवडणूक अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपाला मतदान करा, असे आवाहन संबंधित अधिकारी मतदारांना करत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामतीत ५२ टक्के आणि पुण्यात ४३ टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतदान झाले. यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील २०, गोव्याच्या दोन आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या एका जागेचा समावेश आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ तर उत्तर प्रदेशतील दहा, छत्तीसगडमधील सात आणि बिहारमधील पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर, समाज वादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा, तर वायनाड या आणखी एका मतदासंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लढत आहेत.

राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे.

मंगळवारी सकाळी देशाच्या विविध भागांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमवर समाजवादी पक्षाने शंका उपस्थित करत ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शरद पवार यांनी देखील अशाच स्वरुपाचे आरोप केले आहे.

Live Blog

19:42 (IST)23 Apr 2019
Lok Sabha voting : तिसऱ्या टप्प्यात देशात एकूण ६३.२४ टक्के मतदान

संध्याकाळी सहा वाजता मतदान थांबल्यानंतर देशात तिसऱ्या टप्प्यात ६३.२४ टक्के इतकी मतदानाची नोंद झाली आहे. देशभरातील १५ राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. यांपैकी महाराष्ट्रात एकूण ५६.५७ टक्के इतके मतदान झाले. 

18:59 (IST)23 Apr 2019
देशभरात तिसऱ्या टप्प्यात ६१.३१ टक्के मतदान

देशभरातल्या १३ राज्यांमधील आणि २ केंद्रशासीत प्रदेशातील एकूण ११६ लोकसभा मतदारसंघांसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दिवसा अखेरपर्यंत ६१.३१ टक्के मतदान झाले. 

16:52 (IST)23 Apr 2019
...तर मोदींनी मला कुतुबमीनारवर लटकवले असते: आझम खान

मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हतो. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी पाच वर्षात एकही चूक केली असती तर मोदींनी मला कुतुबमीनारवर लटकवले असते: आझम खान 

16:32 (IST)23 Apr 2019
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान

जळगाव 42.62 टक्के, रावेर 46.04 टक्के, जालना 49.40 टक्के, औरंगाबाद 47.36 टक्के, रायगड 47.97 टक्के, पुणे 36.29 टक्के, बारामती 45.35 टक्के, अहमदनगर 45.65 टक्के, माढा 44.13 टक्के, सांगली 46.64 टक्के, सातारा 44.77 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 47.18 टक्के, कोल्हापूर 54.24 टक्के, हातकणंगले 52.27 टक्के.

16:07 (IST)23 Apr 2019
काश्मीरमध्ये पीडीपी- नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते भिडले

पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या पोलिंग एजंटला केली मारहाण, बोगस मतदानाचा आरोप

15:24 (IST)23 Apr 2019
तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ३७.८९ टक्के मतदान झाले

तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ३७.८९ टक्के मतदान झाले

14:34 (IST)23 Apr 2019
बोगस मतदान करणाऱ्याला औरंगाबादमध्ये ताब्यात घेतलं आहे

औरंगाबादमधील झाकीर हुसेन शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्यामुळे एकाला ताब्यात घेतले आहे.

14:30 (IST)23 Apr 2019
अरुण जेटलींनी बजावला मतदानाचा हक्क
13:59 (IST)23 Apr 2019
एक वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

सांगली- 23 %,  कोल्हापूर- 30%, हातकणंगले- 25%,  औरंगाबाद- 24%,  जालना - 27%, रावेर- 26%, जळगाव- 22%, रायगड- 28 %, पुणे- 20%, सातारा- 22%, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- 30%, बारामती- 24% अहमदनगर- 20%, माढा - 23%

12:57 (IST)23 Apr 2019
माढा, मावळ, बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव निश्चित: खासदार विजयसिंह मोहिते-पाटील

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते- पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला आज मतदानाच्यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीदेखील राष्ट्रवादीला पराभवाची नामुष्की पत्करावी लागेल, असा दावा मोहिते-पाटील यांनी केला आहे.

12:54 (IST)23 Apr 2019
सांगलीच्या महापौरांनी साडीद्वारे केला प्रचार ?

सांगलीत महापौर संगीता खोत कमळ चिन्हांकित साडी परिधान करून मिरजेतील समतानगर मतदान केंद्रावर फिरत असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्ते विक्रम कोळेकर यांनी अॅपवर दिली. सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर 10 मिनीटात दक्षता पथकाने पाहणी केली असता तसा प्रकार आढळला नाही, मात्र पुराव्यासह तक्रार दाखल झाली तर स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल.

12:36 (IST)23 Apr 2019
सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले मतदान

जळगाव 20.34 टक्के, रावेर 21.24 टक्के, जालना 23.28 टक्के, औरंगाबाद 20.97 टक्के, रायगड 23.94 टक्के, पुणे 15.50 टक्के, बारामती 21.33 टक्के, अहमदनगर 20.26 टक्के, माढा 19.63 टक्के, सांगली 20.09 टक्के, सातारा 20.67 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 24.96 टक्के, कोल्हापूर 25.49 टक्के, हातकणंगले 23.45 टक्के. 

11:58 (IST)23 Apr 2019
माढा मतदारसंघातील रिद्देवाडी गावाचा मतदानावर बहिष्कार

सोलापुरातील करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार, आतापर्यंत एकही मतदान झालं नाही, गावात रस्ता नसल्याने नागरिकांचा निर्णय

11:48 (IST)23 Apr 2019
ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत: अखिलेश यादव

ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रामपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. मतदान यंत्रात बिघाडाशिवाय प्रक्रिया पार पडायला हवी: अखिलेश यादव

11:42 (IST)23 Apr 2019
हार्दिक पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क
11:30 (IST)23 Apr 2019
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी विद्या भवन शाळा मॉडेल कॉलनी येथे आई लतिका गोऱ्हे यांच्यासह मतदान केले

11:26 (IST)23 Apr 2019
रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सकाळी सहपरिवार बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

11:16 (IST)23 Apr 2019
उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचाहक्क

सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पत्नी व आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला आहे. 

11:05 (IST)23 Apr 2019
अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला

10:54 (IST)23 Apr 2019
शशी थरुर यांनी केले मतदान
10:52 (IST)23 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईने बजावला मतदानाचा हक्क
10:47 (IST)23 Apr 2019
यंदा एका पक्षाची नव्हे तर NDA ची सत्ता: संजय राऊत

यंदाच्या निवडणुकीत देशात एका पक्षाचं सरकार निवडून येणार नाही. तर यंदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेत येणार. आम्ही एनडीएतील घटकपक्ष असून एनडीएचीच सत्ता येणार: संजय राऊत

10:19 (IST)23 Apr 2019
शशी थरुर यांनी बजावला मतदानाचा हक्क

केरळमधील काँग्रेसचे उमेदवार शशी थरुर यांनी मतदानाच हक्क बजावला, थरुर यांच्याविरोधात भाजपाचे के. राजशेखरन रिंगणात आहेत.

10:06 (IST)23 Apr 2019
नऊ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान रत्नागिरी- सिंधुदुर्गात

मतदारसंघनिहाय आकडेवारी: जळगाव- ७. ८१ टक्के, रावेर - ८. ४८ टक्के, जालना- ९. २१ टक्के, औरंगाबाद - ८. ७७ टक्के, रायगड - ९. ३५ टक्के, पुणे-  ५. ७० टक्के,  बारामती - ८. ५४ टक्के, अहमदनगर - ७. ३७ टक्के, माढा - ६. ८५ टक्के, सांगली - ७. ०४ टक्के, सातारा - ६. ८४ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग - १०. ९७ टक्के, कोल्हापूर - ९. ९७ टक्के, हातकणंगले - ८. ९८ टक्के 

10:02 (IST)23 Apr 2019
सकाळी ९ वाजेपर्यंत पुण्यात ८.७१ टक्के तर अहमदनगर ४ टक्के मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारीबारामती : ६.१ टक्के सांगली : ७ टक्के अहमदनगर : ४ टक्केकोल्हापूर : ६.७१ टक्के पुणे : ८.७१ टक्के माढा : ७.२५ टक्के औरंगाबाद : ९ टक्के

09:47 (IST)23 Apr 2019
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बजावला मतदानाचा हक्क
09:47 (IST)23 Apr 2019
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेले मतदान

पुणे- ८. ७१ %, बारामती - ६. १ %,  दक्षिण नगर - ४. ९७ %,  औरंगाबाद - ९ %, कोल्हापूर - ६. ७१ %, माढा- ७. २५ %, अहमदनगर - ४ %, सांगली - ७ %,  बारामती- ६.१ % मतदान

09:46 (IST)23 Apr 2019
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बजावला मतदानाचा हक्क
09:35 (IST)23 Apr 2019
तासगाव तालुक्यातील वासुंबे मतदान केंद्रावरील सजावट

तासगाव तालुक्यातील वासुंबे केंद्राची करण्यात आलेली सजावट

09:29 (IST)23 Apr 2019
अमित शाह यांनी केले मतदान

गुजरातमध्ये अमित शाह यांनी बजावला मतदानाचा हक्क, अहमदाबादमधील नारनपुरा येथे केले मतदान

09:17 (IST)23 Apr 2019

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी कोठंबी या मूळगावी मतदानाचा हक्क बजावला

09:01 (IST)23 Apr 2019
फोटोगॅलरी: मोदींने आधी घेतला आईचा आशिर्वाद, मग केले मतदान
08:55 (IST)23 Apr 2019
अहमदनगरमधील मतदान केंद्राबाहेरील परिस्थिती

08:49 (IST)23 Apr 2019
मराठवाड्यातही मतदान यंत्रात बिघाड

औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील गारज येथे मतदान यंत्रात बिघाड, दीड तासानंतरही मतदानाला सुरुवात नाही. तर गंगापूर तालुक्यातील बाहेगाव मतदान केंद्रातील यंत्रातही बिघाड. जालन्यात टाकळी अंबड येथेही मतदान यंत्रात बिघाड. बूथ क्रमांक ३२० मधील मतदान यंत्रात बिघाड.

08:43 (IST)23 Apr 2019
मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद: मोदी
08:33 (IST)23 Apr 2019
मतदान करुन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी
08:29 (IST)23 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींने आपला मतदानाचा हक्क बजावला
08:25 (IST)23 Apr 2019
नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

08:25 (IST)23 Apr 2019
नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमधील मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.  निवासस्थान ते मतदान केंद्र हा प्रवास मोदींनी कारमधून केला. या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी. 'मोदी, मोदी' चे नारे.  

08:24 (IST)23 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करण्यासाठी राणिप येथील मतदार केंद्रावर पोहचले
08:22 (IST)23 Apr 2019
सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क
08:21 (IST)23 Apr 2019
पुण्यामध्ये ९३ वर्षांच्या प्रभाकर भिडे यांनी पत्नी सुशीला भिडे (वय ८८) यांच्या सोबतीने मयुर कॉलिनी येथील मतदान केंद्रात मतदान केले.
08:17 (IST)23 Apr 2019
Video: मतदानापूर्वी मोदींनी घेतली आईची भेट
08:14 (IST)23 Apr 2019
कोथरुडमध्ये मतदानयंत्रात बिघाड

पुण्यातील कोथरुड येथील भारतीय शिक्षण संस्था केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड, मतदान पाऊण तास उशिराने सुरु

08:13 (IST)23 Apr 2019

जालन्यात रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केले मतदान

08:12 (IST)23 Apr 2019

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क

08:02 (IST)23 Apr 2019
आधी आईचा आशीर्वाद, मग मतदान

मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे आईच्या घरी गेले. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर नरेंद्र मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.

07:51 (IST)23 Apr 2019
साताऱ्यातील दारेखूर्द येथे मतदान यंत्रात बिघाड

दारेखूर्द येथे मतदान यंत्रात बिघाड,, पाऊण तासापासून मतदानाची प्रक्रिया खोळंबली, अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचले

07:44 (IST)23 Apr 2019
अमित शाह गांधीनगरमध्ये

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातून पूर्वी भाजपातर्फे लालकृष्ण आडवाणी निवडणूक लढवायचे.

07:43 (IST)23 Apr 2019
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये, थोड्याच वेळात करणार मतदान

राज्यातील विविध मतदारसंघांतील ४०० हून अधिक मतदान केंद्रे संवेदनशील क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून त्यात पुण्यात सर्वाधिक ९१ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.

First Published on April 23, 2019 7:32 am

Web Title: loksabha election 2019 voting third phase live updates 116 seats maharashtra 14 seats pune ncp bjp congress
Next Stories
1 कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा त्रिकोण!
2 पुणे, बारामतीमधील मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
3 ठाण्यात राज यांची सभा नाही
Just Now!
X