सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर रविवारी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. त्यामध्ये भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावेळी अनेकांनी ऑस्ट्रेलियातील एक्झिट पोलचे दाखले दिले होते. ऑस्ट्रेलिया एक्झिट पोट कसा चुकीचा ठरला हे विरोधकांकडून सांगण्यात येत होते.

पण प्रत्यक्षात निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार येत आहेत. उलट ज्या ऑस्ट्रेलि्याचे उदहारण दिले जात होते. तिथेच भाजपाच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरु आहे. भाजपा २९२ जागांवर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि मेलबर्न शहरातील भारतीय जनता पार्टी समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केले.