काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना फसवलं असा आरोप भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली. उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा मतदारसंघात जोरदार प्रचार करुन चांगली हवा निर्माण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण प्रत्यक्षात गोपाळ शेट्टी आघाडीवर आहेत. संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिलांचा बळी दिला असा आरोप गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. उर्मिला आणि निरुपम दोघांना याचा फटका बसेल.

माझी लढाई उर्मिला यांच्याशाही नाही तर काँग्रेसशी असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी संजय निरुपम यांच्यावर मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला होता. यावेळी संजय निरुपम यांनी आपल्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती. पण तिथे सुद्धा ते पिछाडीवर आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election result 2019 sanjay nirupam cheats urmila mantondkar gopal shetty allegation
First published on: 23-05-2019 at 12:00 IST