महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदार संघातील महत्वाच्या लढतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या शिरुर लोकसभा मतदार संघात, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये धक्कादायक निकाल पहायला मिळतो आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी कडवी टक्कर देत आघाडी घेतली आहे. प्रचारापासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेत आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. यानुसार मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अमोल कोल्हेंनी मोठी आघाडी घेतल्याचं पहायला मिळतंय.

पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अमोल कोल्हे यांनी अंदाजे १४ ते १५ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी फेऱ्यांमध्ये या दोन्ही उमेदवारांमधली लढत कशी रंगणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रथामिक कलांमध्ये राष्ट्रावादीचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. जुन्नर तालुक्यामधील राष्ट्रवादीच्या युवा मंचचे अध्यक्ष अतुल बेनके यांनी हे बॅनर लावले आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन अर्धातास उलटण्याआधीच अमोल कोल्हेंचे अभिनंदन करणारे हे बॅनर झळकले आहेत.

दरम्यान असे असले तरी शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली पकड असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. कारण अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळणाच्या शक्यता आहे. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत रोमांचक होण्याची शक्यता असल्याची चर्चाचा स्थानिकांमध्ये आहे.