मतमोजणी सुरु होऊन आता दोन तास झाले असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. या राज्यांमध्ये २०१४ सारखे चित्र आहे. एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार कल दिसत आहेत.

उत्तर प्रदेशात बुआ-भतिजा म्हणजे मायावती आणि अखिलेश यादव यांची आघाडी भाजपासमोर मोठी अडचण निर्माण करेल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात अजूनपर्यंत असे चित्र दिसलेले नाही. उत्तर प्रदेशात भाजपा सपा-बसप आणि काँग्रेसच्या तुलनेत बरीच पुढे आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्येही हेच चित्र आहे. काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्ष भाजपासमोर संघर्ष करताना दिसत आहेत. उत्तरेतील सर्वच राज्यांमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या जागांमध्ये मोठे अंतर दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छ्त्तीसगड या तीन राज्यात भाजपाला पराभूत करुन काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. विधानसभेच्या निकालाचा हा कल लोकसभेमध्ये मात्र उलटलेला दिसत आहे. असे सहसा होत नाही. पण या तीन राज्यातील जनतेने लोकसभेसाठी मोदींना पसंती दिल्याचे चित्र आहे. जर हे निकाल शेवटपर्यंत असेच राहिले तर मोदी लाटची म्हणावी लागेल.