अमरावतीमधून वा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत राणा यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा 36951मतांनी पराभव केला आहे. राणा यांना 507844 मते मिळाली आहेत तर अडसूळ यांना 470549 मते मिळाली आहेत.

आनंदराव अडसूळ यांना पुन्हा एकदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिलेली उमेदवारी काही शिवसैनिकांना रूचलेली नव्हती, स्थानिक शिवसैनिकांनी आनंदराव अडसूळ यांची तक्रार थेट मातोश्रीवर केली होती. नवनीत कौर-राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यातील शाब्दिक चकमकिने अमरावती मतदारसंघ चर्चेत आला होता.

utkarsha rupwate, Shirdi, vanchit,
नाराज उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसचा राजीनामा, वंचितमध्ये प्रवेश; शिर्डीतून लढणार
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
house built by smruti Irani in Amethi
इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?
Shobha Bachhav, Congress workers sloganeering,
डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही त्यांनी आपला मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही. गेल्या निवडणूकीतील पराभवचा वचवा राणा यांनी काढला आहे. नवनीत या तेलुगू अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण होते. राणा यांना तब्बल एक लाख महिलांचं मतदान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.