संपूर्ण देशात भाजपची विजयाकडे घोडदौड सुरू असताना चंद्रपूर मतदार संघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचा 44763मतांनी विजय झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सुरेश धानोरकर हे एकमेव काँग्रेसचे खासदार आहे. अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पराभव पहावा लागला आहे. २००४ नंतर प्रथमच येथे काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर पराभवामुळे भाजपात नैराश्याचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना 514744 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना 559507 मते मिळाली आहेत. एकूण झालेल्या मतदानामध्ये अहीर यांना ४१.५६ तर सुरेश धानोरकर यांना 45.18 टक्के मे मिळाली आहेत. सुरूवातीपासून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूस सुरू होती. रात्री उशीरा अहीर यांचा पराभव जाहीर करण्यात आला.

भाजपाच्या विजयाबद्दल आनंद -अहीर
राज्यातील व देशातील जनतेने भाजपावर विश्वास दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड मताधिक्य दिले आहे. या माध्यमातून लोकांनी पंतप्रधानांवर विश्वास दाखविला आहे. भाजपाच्या विजयाचा आनंद आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आपण काही मतांनी मागे आहोत. ‘लेट्स होप’ म्हणत मतमोजणी सुरू आहे. शेवटी निकाल काय लागतो याकडे आपण बघू या, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात आज सकाळी ८ वाजता मतदान मोजणीला सुरुवात झाली. एकूण १२ लाख ३४ हजार १०१ मतांची मोजणी करायची असल्याने पहिल्या फेरीत टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत भाजपचे हंसराज अहीर यांना २० हजार ४२० मते तर काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना २० हजार २६८ मते मिळाली. यात अहीर यांना अवघ्या १५२ मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत अहीर यांना ४२ हजार १२३ तर धानोरकर यांना ४२ हजार १६३ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत धानोरकर यांना अवघ्या ३० मतांची आघाडी मिळाली आणि तिथूनच त्यांची आघाडी कायम राहिली.

तिसऱ्या फेरीत धानोरकर यांनी १ हजार ७१९ मतांची आघाडी घेतली. चौथ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या फेरीत अहीर १३ हजार ३१ मतांनी पिछाडीवर पडले. दहाव्या फेरीत अहीर यांनी धानोरकरांची आघाडी थोडी कमी करत १० हजार ४८१ मतांवर आणली. मात्र अकराव्या फेरीत पुन्हा धानोरकर यांनी अहीर यांना मागे टाकले. त्यानंतर धानोरकर प्रत्येक फेरीत सातत्याने एक हजार ते १२०० मतांची आघाडी घेत होते. सोळा व सतराव्या फेरीअंती धानोरकर ३९ हजार १०६ मतांनी आघाडीवर होते. अजूनही साडेतीन लाख मतांची मोजणी शिल्लक आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅळड. राजेंद्र महाडोळे यांना ८९ हजार ३९५ मते मिळाली तर बसपाचे सुशील वासनिक यांना ९ हजार १०३ मते मिळाली. नोटा पर्यायाने ८ हजार २४३ मते घेतली आहेत. अन्य उमेदवारांनी चार हजाराच्या आसपास मते घेतली. धानोरकर यांना आर्णी विधानसभा मतदारसंघ वगळता राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा व वणीमधूनही साथ मिळाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election 2019 balubhau alias suresh dhanorkar vs ahir hansraj gangaram chandrapur
First published on: 24-05-2019 at 06:54 IST