हातकणंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी पराभवाच्या छायेत आहे. डावी आघाडी, महायुती यांचे पाठबळ घेऊन ते दोनदा लोकसभेत पोहचले होते. मात्र, यंदा राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोठात दाखल झाले होते. मात्र,सध्याची आकडेवारी पाहता राजू शेट्टींचा पराभव दिसून येतोय. राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने रिंगणात उतरले होते.

सध्या राजू शेट्टी 97054 मतांनी पिछाडीवर आहे. अखेरपर्यंत ही आघाडी तोडणं राजू शेट्टींना शक्य होण्याची शक्यता नाही. सध्या शिवसेनेच्या माने यांना 562067 मते मिळाली आहेत. तर राजू शेट्टी यांनी 465013 पडली आहे. राजू शेट्टी यांना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे अस्लम सय्यद यांना 116115 मते मिळाली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी आघाडीमध्ये दाखल झाल्यानंतर हातकलंगणेतील पारंपारिक मतदारांमध्ये नाराजी होती. त्याचाच फटका राजू शेट्टींना बसलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्य़ आणि देश पातळीवर आंदोलन करताना त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला याचाच फटका त्यांना बसला. याशिवाय जैन विरुद्ध मराठा असा संघर्षही परिणाम करणारा ठरला.

राजू शेट्टींचा राजकीय प्रवास –
कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यंदा राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत होता. सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टी यांची जमेची बाजू होती. ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने चव्हाटय़ावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले, त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवासही केला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे, समाजवादी पक्षांची साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केले. तर, गेल्या वेळी भाजप-शिवसेना महायुतीतून काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत केले होते.