15 November 2019

News Flash

माढ्यात राष्ट्रवादीला खिंडार, भाजपाच्या निंबाळकरांचा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली तोच हा माढा मतदारसंघ.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली तोच हा माढा मतदारसंघ. माढामध्ये संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. या लढतीत भाजपाचे निंबळकारांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. निंबाळकरांकडे सध्या 84750 मतांची आघाडी आहे. मतमोजणी प्रक्रिया अंतिम टप्यात असल्यामुले ही आघाडी तोडणं राष्ट्रवादीला शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला भाजपाने खिंडार पाडले असेच म्हणावे लागेल.

सुरूवातीच्या कलांमध्ये माढा मतदार संघामध्ये दोन्ही मतदारांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. अखेरच्या काही फेरींमध्ये निंबाळकरांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे.  सध्या भाजपाने आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे संजय शिंदे 84750 मतांनी पिछाडीवर आहेत. सध्या निंबाळकरांना 583191 मते मिळाली आहेत तर संजय शिंदे यांना 498441 मते मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर करत नंतर माघार घेतल्याने माढा मतदारसंघ चर्चेत आला होता. भाजपाने विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पक्षात घेत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. माढा मतदारसंघात सोलापुरमधील करमाळा, माळशिरस, माढा आणि सांगोला हे चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ११ हजार मतांची मतमोजणी झाली आहे.

First Published on May 23, 2019 11:42 am

Web Title: maharashtra lok sabha election 2019 sanjay mama shinde vs ranjit sinh nimbalkar madha constituency lok sabha election 2019