Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Result : लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल (एक्झिट पोल) समोर आले आहेत. या कलांनुसार, महायुतीच पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रात काय राजकीय परिस्थिती राहिल याचाही अंदाज या कलांमधून समोर आला आहे. यामध्ये राज्यात महायुतीच्या जागा पूर्वीपेक्षा घटणार असल्या तरी तेच आघाडीवर असतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राज्यात वाढणार असल्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात शिवसेना-भाजपा-रिपाइं-रासप यांची महायुती आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही यावेळी वेगळा जोर लावला आहे. वंचितला मिळालेल्या मतांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात वेगळा बदल दिसून येईल असे विविध राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याचा मोठा फटका काँग्रेसला बसून त्यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, एक्झिट पोल्समधून वंचितचा प्रयोग फेल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

असे असले तरी प्रत्यक्षात २३ मे २०१९ रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हाच कोणाची देशात सत्ता येणार हे स्पष्ट होईल.

Exit Poll: राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढणार?

Exit Poll 2019 : NDA पार करणार ३०० चा आकडा

Live Blog

Highlights

    22:26 (IST)19 May 2019
    महाराष्ट्रात युतीचीच बाजी?

    20:35 (IST)19 May 2019
    सी-व्होटर : महायुती आघाडीवर राहणार

    सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार, राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीला ३५ जागा मिळतील तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते.

    20:05 (IST)19 May 2019
    एनडीटीव्ही पोल : भाजपा-शिवसेना-रिपाइं आघाडीवर

    एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्सनुसार, एनडीएच्या जागा गेल्यावेळेपेक्षा घटणार असल्या तरीही यावेळी ते आघाडीवर राहण्याची शक्यता असून आघाडीला जागा वाढणार असल्या तरी ते पिछाडीवर असणार आहेत. पक्षनिहाय विचार केल्यास, शिवसेना-भाजपा -रिपाइं महायुतीला - ३५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला - १२ जागा आणि इतर - १ जागा मिळू शकेल.

    19:37 (IST)19 May 2019
    न्यूज १८-आयपीएसओएस : वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही

    न्यूज १८च्या सर्वेनुसार, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही. तसेच या आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

    पक्षनिहाय जागा : 

    एनडीए : ४२-४५, युपीए : ४-६, इतर : ०

    19:05 (IST)19 May 2019
    एबीपी-नेल्सन पोल : शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त फटका बसणार

    एबीपी-नेल्सनच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला ३४ तर महाआघाडीला १४ जागा मिळतील. पक्षनिहाय अंदाजामध्ये भाजपा -१७, शिवसेना - १७, काँग्रेस - ०४, राष्ट्रवादी काँग्रेस - ०९, इतर - ०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  त्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपाच्या जागा घटतील त्यांना शिवसेनेपेक्षा जास्त फटका बसेल तर शिवसेनेची एक जागा कमी होऊ शकते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागांमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते.

    18:52 (IST)19 May 2019
    इंडिया टुडे -अॅक्सिस : राज्यात महायुती आघाडीवर

    इंडिया टुडे -अॅक्सिस :  भाजपाप्रणित महायुतीला ३८ ते ४२ जागा मिळतील तर काँग्रेसप्रणित आघाडीला ६ ते १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    18:43 (IST)19 May 2019
    राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एनडीएच्या जागा घटणार

    ४८ लोकसभेच्या जागा असणाऱ्या महाराष्ट्रात भाजपासह एनडीएने गेल्यावेळी ४२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ३८ जागांवर विजय मिळेल तर युपीएच्या जागांमध्ये वाढ होऊन त्यांना १० जागा मिळू शकतील.

    18:29 (IST)19 May 2019
    २०१४ मधील एक्झिट पोल काय होते ?

    २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएचा विजय होणार असे म्हटले होते. बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपाला यश येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, निकालात भाजपा एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळाल्याचे दिसून आले. एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला २६० ते २८९ जागा मिळतील, असा अंदाज होता. तर काँग्रेसप्रणित यूपीएला ९० ते ११० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात २०१४ मध्ये 'एनडीए'ने तब्बल ३३६ चा आकडा गाठला. तर यूपीएला फक्त ६० जागांवरच समाधान मानावे लागले.

    18:28 (IST)19 May 2019
    या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

    गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एक्झिट पोलबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण एक्झिट पोलमधील अंदाज प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतात. काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलमधील अंदाज चुकल्याचे समोर आले असून या निवडणुकांचा घेतलेला आढावा… वाचा सविस्तर>>

    18:28 (IST)19 May 2019
    एक्झिट पोल म्हणजे काय ?

    एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? वाचा सविस्तर>>

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Maharashtra lok sabha election exit poll result 2019 live updates bjp congress ncp shiv sena c voter chanakya
    First published on: 19-05-2019 at 18:17 IST