खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे यांच्यासह चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील विविध पदाधिकार्यानी शिवसेनेचे खासदार व यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी केलेल्या किमयेमुळे ‘स्वाभिमान’ला हा दणका बसला आहे. उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चिपळूणचे मंगेश शिंदे, त्यांच्या पत्नी आणि स्वाभिमाच्या महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे, कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष विलास जाधव, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, गुहागर महिला तालुकाध्यक्ष दिप्ती चव्हाण, चिपळूण तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्ये, सचिव संजय जगताप, खुडदे सरपंच प्रकाश निवाथे, नांदिवसे विभागप्रमुख राजेंद्र शिंदे, आदिवासी तालुकाध्यक्ष शशिकांत निकम, महिला जिल्हाध्यक्ष निता निकम, वेळणेश्वर विभागप्रमुख दिपक चव्हाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष कपील काताळकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, नांदिवसे विभागप्रमुख शशिकांत शिंदे यांनी शिवबंधन स्विकारले. तर युवक जिल्हाध्यक्ष वैभव वीरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप
satara lok sabha election marathi news, ncp satara marathi news
लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोध, उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही नकार

रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. खासदार राऊत यांच्यासह गचिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख बाळा कदम, विलास चाळके, सह संपर्क प्रमुख राजू महाडिक, सुधीर मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी भूमिका मांडताना शिंदे म्हणाले की, राणेंबरोबर आम्ही दहा वष्रे जातिवंत कार्यकर्ता म्हणून काम केले. पण पाच रुपयांचे काम झाले नाही. अगदी निवडणुकीच्या तोंडावर तरी नीलेश राणेंकडून व्यवस्थित वागणूक मिळेल, असे वाटत होते. तालुकाध्यक्षासारखा माणसाला त्यांच्या पगारी नोकरांकडून संपर्क करावा लागायचा. निवडून आल्यानंतर आम्ही बघू अशी त्यांच्या तोंडची वाक्य होती. ऐकून किती ऐकायचं, आज दखल घेतील, उद्या घेतील असे वाटत होते.

जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या दोन आठवड्यात मला एकदाही संपर्क केला नाही.  मी पूर्वीचा शिवसनिक आहे. माझी पत्नी पंचायत समिती सदस्य होती. काही दिवसांपूर्वी  चिपळूण दौर्यात एका हॉटेलमधील बठकीत नीलेश यांनी, मांडीला मांडी लावून बसणारे लांब होत आहेत. ठीक आहे, मी बघून घेईन असे वक्तव्य केले. अशी अवहेलना होत असेल, तर बाहेर पडण्याची हीच वेळ आहे, असे वाटले. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

पराभव दिसू लागल्याने ही खेळी – नीलेश

दरम्यान, शिंदे माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. मात्र मतदानापूर्वी जेमतेम अठ्ठेचाळीस तास आधी असे काय घडले, याचा विचार लोकांनीच करावा. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे नव्हे, तर त्यांचे स्वतचे नुकसान झाले आहे. डोळ्यासमोर पराभव दिसून लागल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत अशा खेळ्या करीत आहेत, अशी प्रतिक्रिया  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व उमेदवार नीलेश राणे यांनी दिली आहे.

शिंदे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले की, उमेदवार असल्यामुळे तेरा तालुक्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. कधी मेळाव्यात, कधी मंदिरात, तर कधी बठकांमध्ये व्यस्त होतो. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कुटुंबाचे सदस्य म्हणून दुर्लक्ष झाले, पण त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. आक्षेप घेण्यासारखे मी केव्हाही त्यांच्याशी वागलो नाही. शिंदेंनी संदर्भ दिलेले हॉटेलमधील वक्तव्य हे शिंदेंसाठी नव्हे, तर तत्कालीन काँग्रेसमधील एका जुन्या पदाधिकार्याबद्दल होते. बघून घेईन, हे माझे नेहमीच्या बोली भाषेतील वाक्य आहे.