News Flash

ते ‘सोनार बांगला’ बद्दल बोलत आहेत, पण ‘सोनार भारताचे’ काय? ममतांचा मोदींना सवाल

"बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले"

ज्या वेळी पीएम मोदी कोलकातामध्ये होते त्याच वेळी ममता बॅनर्जी यांनी दार्जिलिंग मोरे येथून ‘पदयात्रा’ काढली. या यात्रेमध्ये एलपीजी सिलिंडर्सच्या पुठ्ठ्याची प्रतिकृती हातात घेत हजारो समर्थकांनी भाग घेतला. या बैठकीला टीएमसी मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि पक्षाचे खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां उपस्थित होते.

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या ‘सोनार बांगला’ या आश्वासनावर टीका करताना म्हणाल्या की मोदी खोटारडे आहेत. बंगालमध्ये इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या जात असताना आणि बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले होते.

“ते सोनार बांगला बद्दल बोलत आहेत. पण सोनार भारताचे काय? एलपीजीचे दर वाढत आहेत, मोदींचे तोलाबाजीही वाढत आहे … त्यांनी दिल्लीला विकले. एअर इंडियापासून ते बीएसएनएलपर्यंत ते सार्वजनिक मालमत्ताही विकत आहेत,” असे बॅनर्जी यांनी सांगितले.

मोदींचे छायाचित्र असलेले कोविड -१९ लसीकरणाच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित करीत ममता म्हणाल्या, “कोविड दरम्यान ते येऊ शकले नाहीत. मी रस्त्यावर होते. आज त्याचा चेहरा कोविड लसी प्रमाणपत्रांवर आहे. हे आमचे वैज्ञानिक आहेत की ज्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. “

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 5:33 pm

Web Title: mamata banerjee walks with lpg cylinder in hand in a rally sbi 84
Next Stories
1 मी क्रोबा, एक दंशही पुरेसा; भाजपात दाखल होताच मिथून चक्रवर्तींचा इशारा
2 ७५०० व्या ‘मोदी की दुकान’ केंद्राचे लोर्कापण; अडीच रुपयांत मिळणार सॅनिटरी पॅड
3 ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींचा ‘तृणमूल’वर हल्ला
Just Now!
X