मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित उज्वला गॅस योजनेची पोलखोल केली. ग्रामीण भागात महिला चुलीवर स्वयंपाक करतात. चुलीचा वापर करताना होणाऱ्या प्रदूषणामुळे महिलांना विविध आजारांचा सामना करावा लागतो.

त्यातून महिलांची मुक्तता करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उज्वला गॅस योजना सुरु केली. पण प्रत्यक्षात ग्रामीण भागातील महिला आजही चुलीवरच स्वयंपाक करतात हे वास्तवं आहे.

राज ठाकरेंनी आजच्या सभेमध्ये बीबीसीचा व्हिडिओ दाखवून या योजनेची पोलखोल केली. या योजनेच्या पहिल्या लाभार्थी गुड्डी देवी आजही चुलीवर जेवण बनवतात. तीन वर्षात गुड्डी देवींनी फक्त ११ सिलेंडर घेतले आहेत. कारण सिलिंडरचे दर परवडत नसल्यामुळे गुड्डी देवी यांच्यासमोर आजही चुलीवर स्वयंपाक बनवण्याशिवाय पर्याय नाही.