नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा राजकीय क्षितिजावर दिसू नयेत यासाठी मतदान करा. मोदी पुन्हा सत्तेत आले तर पत्रकार लिहू शकणार नाहीत. बोलू शकणार नाहीत. देशाला हुकूमशाही पाहिजे की, लोकशाही हे ठरवण्याची ही निवडणूक आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगळीचा पुण्यातील सभेत समचार घेतला.

राज ठाकरेंना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मोदींना शेतकरी, जवान कोणाबद्दलही आस्था नाही. नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे देश रसातळाला जाईल असे राज म्हणाले. बुलेट ट्रेन आणली. या ट्रेनचा उपयोग काय? अहमदाबादला जाऊन ढोकळा खायचा.

गुजरातमधील लोक गुजरात सोडून महाराष्ट्रात का येत आहेत? कारण भाजपाने गुजरातमध्ये काहीही केलेलं नाही. बाहेरील देशातील कोणी अध्यक्ष, पंतप्रधान आले की मोदी त्यांना फक्त गुजरातमध्ये घेऊन गेले मोदी पाच वर्षात संपूर्ण जग फिरले पण किती पैसे आणले? अशा शब्दात मोदींचा समाचार घेतला.

मोदी सरकारच्या राजवटी आरबीआयच्या गव्हर्नरनी राजीनामा दिला. मोदी त्यांच्याकडे बँकांसाठी राखीव असलेल्या निधीमधले पैसे मागत होते. आपल्या मर्जीतील माणूस तिथे बसवला आणि त्यांच्याकडून २७ लाख कोटी रुपये बाहेर काढले. मोदी आरबीआयकडून पैसे घेणार होता मग तुम्ही युद्ध कुठल्या जीवावर करणार होता ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. पाच वर्षांपूर्वी मोदींनी या देशाला जी स्वप्नं दाखवली होती. त्यावर आज एक चकार शब्द बोलायला मोदी तयार नाहीत असे राज म्हणाले.