महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वीच त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरुद्ध प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली. पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे 'स्मार्ट' भाषण नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. त्यानंतरच्या दोन्ही सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर करुन सरकारवर घणाघाती टिकास्त्र सोडले. याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच 'लाव रे तो व्हिडिओ'बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही स्टाइल आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांड़ले आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर 'लाव रे तो व्हिडिओ' नावाने अनेक पोस्ट करण्यात आल्या असून हे चार शब्द सध्या नेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. पाहुयात असेच काही 'लाव रे तो व्हिडिओ'वाले ट्विटस. एवढा प्रतिसाद मैं भी चौकीदारलाही नाही 'ए लाव रे तो व्हिडीओ' या एका वाक्याला जेव्हढा प्रतिसाद मिळालाय ना तेव्हढा तो 'मैं भी चौकीदार' कॅम्पेनला अख्ख्या देशात मिळालेला नाही! — amey tirodkar (@ameytirodkar) April 16, 2019 असचं चालू राहिलं तर राज साहेबांच हे " लाव रे तो व्हिडीओ.." असंच चालू राहील तर विधानसभेपर्यंत अस चित्र होईल ! #राजठाकरे #लोकसभानिवडणूक pic.twitter.com/CWronXvwyy — faijal khan (@faijalkhantroll) April 16, 2019 जाऊदे ना व. भक्त :- राज ठाकरे जनतेची दिशाभूल करत आहेत. राज ठाकरे :- ए लाव रे तो विडियो.. भक्त :- असं काय करता जाऊदे ना व. #म #मराठी — Rofl Gandhi (मराठी) (@RoflGandhi_M) April 16, 2019 फिलिंग वंडरफूल म्हणे. "ए, लाव रे तो video" #RajThackeray — feeling wonderful — sujeet natkar (@Ssuujjeett) April 15, 2019 एकमेव वाक्य महाराष्ट्रातील राजकारणात धडकी भरवण्याची ताकद असलेलं एकमेव वाक्य "लाव रे तो विडीओ" #राजठाकरे #RajThackeray — satyajit kukade (@s_kukade) April 17, 2019 समर्थकांच्या अंगावर काटा येतो भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात धडकी भरवणारे वाक्य “ए तो व्हिडीओ लाव रे.” शांत वाटणाऱ्या निवडणुकीत रंगत आणली @RajThackeray ह्यांनीच. @SandeepDadarMNS pic.twitter.com/A0euEyhKbs — मराठी माणुस (@MarathiAamhi) April 16, 2019 राजकारणातील सर्वात खतरनाक वाक्य After listening to current Raj Thackeray speeches one thing is for sure. The most threatening dialogue in current political scenario. .. .. .. .. .. ए लाव रे तो व्हिडिओ — Illogical (@puneriboka) April 17, 2019 चौकीदार चोर है या अफाट यशानंतर #चौकीदार_चोर_है' च्या अफाट यशानंतर 'ए लाव रे तो व्हिडीओ' — सचिन बाळासाहेब कुंभार (@SachinSpeaks) April 16, 2019 चूक झाली राज ठाकरे - लाव रे तो व्हिडिओ मोदी - बस करा ना भाऊ चूक झाली परत खोटं नाही बोलणार राज ठाकरे - चुकीला माफी नाही#RajThackeray — Suraj Pawar (@SurajPa09479477) April 17, 2019 सगळं आठवतं "जरा बस तुझ्याशी बोलायचंय" असे आई बापानी म्हंटल्यावर मुलाची जी अवस्था होते तीच म्हणे हल्ली काही लोकांना 'ए लाव रे तो व्हीडिओ" ऐकल्यावर होते. .सगळे कांड एकत्र आठवतात. — मराठी 'ट्रोल'कर (@trollinMarathi) April 17, 2019 सहनही होईना आणि सांगताही येईना लाव रे तो व्हिडिओ.. म्हटल्यानंतर सर्व भक्तांमध्ये धडकी, आणि व्हिडीओ बघताना घाम येतो आणि व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्या मूर्ख भक्तीची जाणीव होते. आणि आतापर्यंत मोदी मोदी बोंबल्ल्यामुळे सहनही होईना आणि सांगताही येईना.. — Rishi B W. (@RishiBW101) April 17, 2019 एपिक स्टाइल "लाव रे तो video" is an epic style of giving a speech invented & perfected by #RajThackeray — Suraj Patil (@igeeko) April 16, 2019 त्यांना इग्नोर करु शकत नाही You either love him or hate him. But you can’t ignore him. ए लाव रे तो व्हिडीओ ..#Rajthackeray #लोकसभानिवडणूक२०१९ pic.twitter.com/8LnjhawaoC — ATUL BHATMARE (@bhatmareatul) April 16, 2019 लाव रे व्हीडीओ म्हटल्यावर. ॲड.अनंत खेळकर अकाेला धास्ती.. ——- ऐ लाव रे तो व्हीडीओ ,म्हणताच ह्यांच्या काळजात धस्स झाले ‘राज’ कारण सांगत आहे आता ‘थापा’ मारणे बस्स झाले त्यांच्या मुखवट्याची हल्ली ‘हरी’-‘साल’ काढत आहे पांघरलेले बुरखे सुध्दा टराटरा फाडत आहे pic.twitter.com/GfRWYxwQb9 — Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 17, 2019 तो व्हिडीओ पण लावा 'ए लाव रे तो व्हिडीओ' मध्ये तावडेंचा गाडीवाला व्हिडीओ बघायची खूप इच्छा आहे. — टिपरे (@AAbaSpeaks) April 16, 2019 भक्तांना भिती लहान असताना जसे आपले वडील आईला म्हणायचे ``घे बरं बेल्ट,बघतो याला.`` तसे सध्याच्या घडीला राज ठाकरे भक्तांसाठी म्हणतायत.``लाव रे तो व्हिडीओ.`` तेव्हाची आपल्यात भीती आणि आताच्या या वाक्यात भक्तांची भीती सेम आहे. #मराठी#AbAAPkiBaari — Supriya Kawathekar (@Supriyak2207) April 16, 2019 थप्पड से डर नही लगता साहब. *थप्पड से डर नही लगता साहब,* *"" ए लाव रे तो व्हिडिओ "" म्हणल्यावर फाटते. -- भक्त* @RajThackeray @RohitPawarSpeak @NCPspeaks pic.twitter.com/PAAgXRaoVd — Prashant Wakhare Patil (@PrashantWakhare) April 16, 2019 ट्रोल राज ठाकरेंनी - "ए लाव रे तो व्हिडीओ" म्हटले की अंधभक्त व भाजपाचे लोक हवालदिल होतात,घाम फुटतो मोदीच आताच्या मोदीला ट्रोल करतात — Asim Sarode (@AsimSarode) April 16, 2019 आता सरकार एलईडी बंदी आणणार DJ बंदी नंतर बहुतेक विधानसभेपर्यंत LED स्क्रीन वर बंदी येऊ शकते. ये लाव रे तो व्हिडीओ..#राजसभा_सोलापूर — Prof.R.S. Jadhav (@jadhav_prof) April 16, 2019 जोमात अन् कोमात आधी 'लाव रे तो व्हिडिओ'. आता 'आणा रे त्याला'. राज साहेब जोमात भक्त कोमात.#RajThackeray pic.twitter.com/9s3ENl7iMw — Omkar Naik (@Omkarsureshnaik) April 15, 2019 दरम्यान राज यांच्या दौऱ्यामधील तीन सभा झाल्या असून आणखीन तीन ठिकाणी ते सभा घेणार आहेत. यापैकी सातारा येथे आज (१७ एप्रिल), पुण्यात १८ एप्रिल रोजी शिंदे मैदानात राज यांची सभा होणार आहे. दौऱ्यातील शेवटची सभा शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रायगडमधील बांदे मैदानात होणार आहे.