मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची परिस्थिती दाखवल्यानंतर मोदींचे मूळगाव वडनगर गावची स्थिती दाखवली. मोदी आपल्या प्रत्येक सभेत शौचालये बांधण्याची गरज का होती? त्यांच्या सरकारने किती शौचालये बांधली त्याची माहिती देतात. पण प्रत्यक्षात मोदीच्या वडनगर गावात शौचालयाची काय परिस्थिती ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले.

मोदींच्या गावात आजही पुरेशी शौचलये नसल्यामुळे महिला वर्गाला कशा प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. मोदींनी बिहारमध्ये एका सभेत एका आठवडयात साडेआठ लाख शौचालये बांधल्याचा दावा केला होता याचा अर्थ मिनिटाला ८४ आणि सेकंदाला सात शौचालये बांधली असा होतो. थापा मारायला मर्यादा आहेत की, नाही? मोदींच्या स्वत:च्या गावची परिस्थिती इतकी वाईट असेल तर देशाची किती वाईट असेल याचा विचार करा असे राज म्हणाले.