09 August 2020

News Flash

जाणून घ्या लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा गेम प्लान आहे तरी काय?

राज ठाकरे एकूण सहा प्रचारसभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

मनसेने लोकसभा निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आहे. तसेच मनसे नेते राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत हेदेखील पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अशात मनसेचा निवडणुकांसाठीचा गेम प्लान समोर येतो आहे. राज्यभरात राज ठाकरे सहा प्रचारसभा घेणार आहे. आपल्या आधीच्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारत हेच आमचे ध्येय आहे असे म्हटले आहे. अशात आता राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे सहा ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत असे समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

सोलापूर, नांदेड, मावळ यासह एकूण सहा ठिकाणी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. या प्रचारसभा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या प्रचारासाठी असल्या तरीही त्यांचे उमेदवार मंचावर असणार नाहीत असंही वृत्त आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार यांच्यासाठीही राज ठाकरे प्रचारसभा घेतील, त्यावेळी पार्थ पवार मनसेच्या मंचावर दिसणार का हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

उर्मिला मातोंडकर यांनीही राज ठाकरेंना प्रचारात मदत करण्याची विनंती केली. मात्र त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार नसल्याची माहिती समोर येते आहे. राज ठाकरेंच्या या सभांमध्ये सोलापूर, नांदेड आणि मावळचा समावेश आहे. सोलापुरातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे मैदानात आहेत. त्यांच्यासमोर बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान आहे. तर नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रिंगणात आहेत. मावळमधून पार्थ पवार रिंगणात आहेत. त्यांच्या समोर श्रीरंग बारणे आहेत. आता राज ठाकरे या सगळ्यांचा प्रचार कसा करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2019 2:14 pm

Web Title: mns chief raj thackeray will hold six rallys in maharashtra for congress and ncp
Next Stories
1 ‘बजाज चेतक’ १३ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यांवर धावणार?; नव्या फिचर्ससह लॉन्चिंगची शक्यता
2 राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान गोंधळ, ट्रकचा रॉड तुटून पडल्याने तीन पत्रकार जखमी
3 ‘अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची तुमची जात, आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही’; आव्हाडांचा मोदींवर हल्लाबोल
Just Now!
X