मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे शहीद झाले. माझ्या शापामुळे हेमंत करकरे गेले असे साध्वी प्रज्ञासिंह म्हणते. असे बोलताना काहीच वाटत नाही. शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी का दिली? साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे अमित शाह समर्थन करतात. भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. पुलवामा हल्ला गुप्तचर अपयश नाही. पुलवामा हल्ल्याआधी बॉम्बस्फोट होऊ शकतो हे सांगितलं होतं. तरीही जवानांना त्या मार्गावरुन का पाठवलं? असा सवाल राज यांनी केला.

राज ठाकरे यांनी काल ‘मोदी है तो मुमकीन है’ जाहीरातीची पोलखोल केली होती. त्यावेळी त्यांनी जे कुटुंब काल स्टेजवर आणले होते. त्यांना आज पुन्हा स्टेजवर बोलावले. व त्यांची ओळख करुन दिली. ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहीरातील त्या कुटुंबाल गरीबीशी जोडण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ते सधन कुटुंब आहे.

त्या जाहीरातीतील योगेश जनार्दन चिले याचा मूर्त्या बनवण्याचा व्यवसाय असून त्याचे वडिल जर्नादन चिले हे निवृत्त बीईएसटी कर्मचारी आहेत. आई निवृत्त महापालिका कर्मचारी आहे. हे राज ठाकरे यांनी सांगितले. भाजपवाले माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. खोटं बोलण्याचा रोग संपूर्ण पक्षाला झाला आहे. मोदींनी जेवढया योजना सांगितल्या त्याच्या जाहीरातींवर ४५०० ते ५५०० कोटी रुपये खर्च केल्याचे राज यांनी सांगितले.