– साठ वर्षात पंडित नेहरु, इंदिरा गांधीनी काही केलं नसतं. तर व्हॉट्स अॅप कुठून आलं असतं तुम्ही खोटा प्रचार कसा करु शकला असता मोदी.

– कॅप्टन अमोल यादव यांना ३५ हजार कोटी रुपये प्रकल्पात गुंतवणार म्हणून महाराष्ट्र सरकारने फसवं आश्वासन दिलं.

– माझ्या हाताला खोटया गोष्टी लागू नयेत म्हणून इंटरनेटवरुन त्या गोष्टी काढल्या जात आहेत.

–  भाजपाला उघड पाडण्याचा विचार काल, परवाचा नाही. सहा महिन्यापासून तयारी सुरु होती.
– राजकारण्यांनी खोटी स्वप्न दाखवू नयेत म्हणून जुने व्हिडिओ दाखवत आहे.
– नोटबंदीपूर्वी जेवढी रक्कम फिरत होती, त्यापेक्षा जास्त रक्कम आता फिरत आहे.
– निवडणुकीत भाजपा हजारो कोटी रुपये वाटत आहेत. कुठून आले पैसे तुमच्याकडे?